अनेक दिवसांनी ओव्हरऍक्टिंग नसलेला मराठी विनोदी चित्रपट पाहायला मिळालाय.....
एकदम रिलॅक्स, रेफ्रेश, आणि थोडासा अंतर्मुख करणारा सिनेमा...म्हणजेच पोश्टर बॉइज... !!
पोश्टर बॉइज च्या प्रमोशन साठी जोरदार कँपेनिंग करणारी टीम रेडिओ सिटीच्या ऑफिस मध्ये येणार हे कळल्यावर त्यांना भेटण्याचे प्रयत्न चालू झाले... SMS, कॉल्स, फेसबुकवरील प्रश्नोत्तरे... सगळे प्रकार केले, आणि अर्थातच त्या प्रयत्नांचे आणि आमच्या नशिबाचे फळ म्हणून आम्ही त्यांच्याशी आर जे शोनालीच्या स्टार कट्टा वर गप्पा मारायला पोहोचलो सुद्धा... !!
हरिहरन सोबत
"ओ हो.. काय झालं ! " किंवा ...इथून धक्का तिथून धक्का" वर ठेका देणारे लेसली, किंवा श्रेयस/अनिकेत/पुजा ह्यांच्यापैकी कोणीही आपले बाउंसर्स घेऊन वर आले नव्हते... ते सगळे खाली गाडीजवळ उभे होते.....
आलेल्या सगळ्या टीमने "स्टार"पणाचे कोणतेही दडपण येऊ न देता दिलखुलास आणिमोकळेपणाने गप्पा मारल्या, कथा कशी सुचली - सेट वर काय काय मजा झाल्या,
कोणा कोणाची मदत झाली हे सांगितल्यावर सगळ्यांचा एकच हशा पिकला....
मग सगळ्यांचे त्यांच्यासोबत फोटो काढायचा कार्यक्रम आणि मग एका डान्स ग्रुप ने केलेला "पोष्टर बॉईज" च्या गाण्यावरील नाच पाहून आम्ही घरी परतलो !
कोणा कोणाची मदत झाली हे सांगितल्यावर सगळ्यांचा एकच हशा पिकला....
मग सगळ्यांचे त्यांच्यासोबत फोटो काढायचा कार्यक्रम आणि मग एका डान्स ग्रुप ने केलेला "पोष्टर बॉईज" च्या गाण्यावरील नाच पाहून आम्ही घरी परतलो !
ट्रेलर्स, टीम ला भेटल्यामुळे सिनेमाची उत्सुकता होतीच..... शनिवारी रात्री हाऊसफुल असल्याने हिरमोड होऊन परतलो, पण रविवार ची तिकिटे तेव्हाच काढली .... कारण पुन्हा त्याच तिकिटावर तिच निराशा नको

एकाच गावातल्या ३ लोकांचे जत्रेत काढलेले फोटो शासनाच्या नसबंदीच्या पोष्टरवर कसे येतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळं येतं आणि त्यातून ते मार्ग कसा काढतात - This is the crux of the story ! विषय साधाच आहे... परंतु बऱ्यापैकी व्यापक ठरू शकणारा आहे.
पण ज्या पद्धतीने तो दिग्दर्शित केला आहे, पटकथा आणि संवाद लिहिले गेले आहेत, अचूक वेध घेणारी गाणी आणि ठेका लक्षात राहतो... तिघांचेही "टायमिंग" अगदी म्हणजे अगदी पर्फेक्ट जमलेले आहे.... २-३ विनोदांच्यावेळी तर अक्षरशः पुन्हा एकदा अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे- सचिन'च समोर आहेत असे वाटले इतके टायमिंग जुळलेले आहे !!!
साधेच प्रसंग दाखवताना देखील खूप छान बांधणी केलेली आहे, उ. दा - तातडीने जावयाला भेटायला जाणारे देशमुख - दिलीप प्रभावळकर गाडीने कट मारल्यावर मास्तरांना खिडकीतून कारण देखील सांगतात की जरा गडबडीत आहे बरं का मास्तर ! त्यांची ऍक्टींग ही नेहमीच अफलातून असते, "आबा" मदत करा म्हणत अर्जुन त्यांच्याकडे येतो आणि ते मदत करतात तेंव्हा नेहमीच मला मदत करणारे माझे आजोबा पण आठवले !

मास्तरांच्या बायको - नेहा जोशीने द्विअर्थी वाक्यांचाभडिमार करत कथेचा वेग कायम ठेवला आहे...
कुठेही अति वल्गर न होणारी काही काही डबलमिनींग ऐकताना तर हसून हसून पुरेवाट होते...इतकी की एक हशा संपेस्तोवर दुसरा डायलॉगही निघून जातो..
अनिकेत विश्वासराव म्हणजेच अर्जुन हा सिनेमाचा हीरो आहे, आणि तो वागतोही तसाच... उ. दा. - मुलीला छेडणाऱ्याला बेदम मारणारा, मुक्या फोटोग्राफेर सोबत डंबशेराज करत माहिती काढून घेताना मेमरी कार्ड हा शब्द ओळखतो आणि सगळे टाळ्या वाजवून हसत असतानाच एक कानाखाली ठेवून :"चल पुढे सांग" म्हणणारा किंवा वैतागलेला असताना वाचेचा कंट्रोल सुटून रागाच्या भरात काहीही बरळत "नागड्याने" उपोषणाची घोषणा आणि तेंव्हाचा संपूर्ण सीक्वेन्स पाहायलाच पाहिजे !!!
IN ALL, फॅंटॅस्टिक कॉमेडी !!
तसे बरेच "सामाजिक विषय आणि तात्पर्य" मांडले गेलेले आहे.. पण "आपल्या जवळचे लोकांची साथ असेल तर माणूस कितीही मोठ्या संकटातून सहज मार्ग काढू शकतो" हाच संदेश पटकन उचलला जातो ! तसेच सिनेमा फ़ुकट फोटोसेशन करण्याच्या सुविधा असलेले कार्निव्हल्स वगैरे पासुन सावधान करतो !! गाणी तर घरी जाईस्तोवर गुणगुणत राहाल अशी बनली आहेत... !
तिन्ही पोष्टर बॉइज, श्रेयस तळपदे, रेडिओ सिटी,आर. जे. शो शो शोनाली आणि संपूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद !!