Friday, July 22, 2016

आता वाटचाल -> "सिंहासन बत्तीशी" कडे !!!

आता वाटचाल - "सिंहासन बत्तीशी" कडे !!! 

गेल्या वर्षी खरे तर ठरवले होते की दर महिन्याला किमान एक लेख लिहायचा, पण वर्षभरात केवळ एकच लेख लिहिला गेला... तसे ५-६ लिहिले होते पण आपल्याला स्वतःला पटेल असे टर्न्स आणि ट्विस्ट नसतील तर लोकांना तरी कसे आवडणार ना.. त्यामुळे हिशेबात एकच लेख! (ह्यावर्षी बघू कसे जमते)

मागच्या वाढदिवसालाच ठरवले होते हे २०१६ वर्ष म्हणजे extra curricular activities,trainings आणि "BAU" व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी करायच्या!! त्याप्रमाणे ६०% पेक्षा जास्त केल्याही :)!! भरपुर नवीन मित्र-मैत्रिणी मिळवले ! रेडिओ जॉकी मित्रांच्या समवेत अनेक आठवणीत राहतील असे प्रसंग अनुभवले ! काही AWARDS कमावली ! IN-ALL वर्ष प्लॅन प्रमाणे ठिक-ठाक गेले !!

आता ह्या वर्षी No Plans.... No Red Tapes.... No Protocols !! !
जे समोर येईल, जसे येईल तसे स्विकारायचे आणि पुढे जायचे ! AGENDAएकच, तो म्हणजे पुढे काय.... !! 
एखादे Specific Target समोर नसेल तर जे समोर असेल तेच Target बनत जाते !! बरीच वर्ष  plan, execute, re-plan मध्ये गेली... आता मात्र तसे नाही ! किमान ह्या वर्षी तरी ! 
  ( एखादे वर्ष वेगळे जगून पाहुया.... )


This year's Only Motto is --> सुलतान को कोई हरा सकता है तो वो बस सुलतान खुद !! 
क्युं की कोई तुम्हे तबतक नही हरा सकता, जब तक तुम खुद से न हार जाओ !!