Saturday, July 22, 2017

"क्लब-३३" - अर्थात तिसरे तप संपायला ३ कमी !!


२०१६ मध्ये ठरवल्याप्रमाणे, न ठरवताच समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरा गेलो  आणि असे लक्षात आले की आजवर प्लॅन करून घडलेल्या गोष्टी आणि ह्या अचानक समोर आलेल्या अगदी कमी तयारी असताना केलेल्या गोष्टींच्या रिझल्ट्स मध्ये खूप काही फरक नाहीये... ! In Fac, अचानक आलेल्या गोष्टी जास्त कार्यक्षमतेने handle केल्या गेल्या आहेत !!

बऱ्याचं दिवसांपासूनची Pending कामे मार्गी लागली..... USA ची ट्रीप झाली, तिकडच्या लोकांनी प्रशंसा केल्यानंतर इथे देखिल कंपनीतील एक महत्त्वाचे  award जाहीर झाले...Promotion(अर्थात फक्त रोल बदलला).... एकंदरीत काय तर Professionally अच्छे दिन ची सुरुवात झाली असे म्हणू शकतो.

मागच्या वर्षीप्रमाणेच बरेच नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले - जगन्मित्र ह्या स्वभाववैशिष्ठ्यामुळे दरवर्षी मित्रांची संख्या वाढतच जात आहे...:)  

२०१७ ला साधारण ४ महिने "फेसबूक" बंद केल्यामुळे विविध प्रश्न येत होते, की हे काय नवीन ?, उगीच काहितरी करत असतो, फुकट नाटकं वगैरे वगैरे.. पण त्याचे खरे कारण म्हणजे, ७७.४ किलो वजन आणि ग्रुप फोटो मध्ये आपला झालेला विस्तार! आता ह्या गोष्टीची परस्पर लिंक कशी काय ?

तर, मला public interaction ची खूप आवड आहे, आणि मी प्रचंड प्रसिद्धीलोलुप माणूस आहे, मला कायम लाइमलाइट/चर्चेत राहायला आवडते (राखी सारखे नव्हे बरं का ! ) अर्थात चांगल्या गोष्टींसाठी !!.
आजकाल निम्मी जनता फक्त फेसबुकवरच भेटते......उदाहरणार्थ शेजारच्या गल्लीत राहणारा माझा मित्र कायम नाइट शिफ्ट करतो... आणि आमचे weekoff पण वेगवेगळे, त्यामुळे ५०० मीटर अंतरावर असून आमचे भेटणे जास्त होत... { उगीच सल्ले देऊ नका की एकदा फोन करून भेटायचा, १५ ऑगस्ट, जानेवारी २६ ला तरी भेटायचं वगैरे, आम्ही दोघं २४*७ मध्ये आहोत आणि शक्य ते सगळे  Options Try करून झालेत... )

असो, मुद्दा हा की फेसबुक वर सगळे लोकं वेळा-काळाचे बंधन न बाळगता भेटू शकतात... ! समजा मी फेसबुक बंद केले तर माझे मन मला खात राहिलं, की एवढे दिवस तू ह्या मित्रांशी बोलला भेटला नाहीसं, जगात कोण काय करत आहे ते बाकी सगळ्ञांना समजत आहे केवळ मलाच नाही ! मी काय करतो हे मला माहीत आहेच पण ते लोकांना कळावे हे देखिल महत्त्वाचे असते ते होणार नाही...  Online Contests मधून नवीन बक्षिसे  जिंकता येणार नाहीत !! म्हणजे किती हे नुकसान !!

मग ठरवले,  वजन कमी करून एकदम फिट-&-फाइन होईस्तोवर फेसबुक बंद ठेवायचे ! ६४ - ६८ हा टार्गेट टॅग माझ्या आरशावर लावून ठेवला !! रोज सकाळी उठल्यावर हा टॅग दिसायचा.... !! दर एक आठवड्याने वजन करायचो. बरेच दिवस पाहीन पाहीन म्हणत बाकी ठेवलेले भाग मिल्खा भाग पाहिला आणि मी खुपच Motivate झालो ! मार्च २०१७ मध्ये ७७.४ किलो वजन असताना रोज ४-५ किलोमीटर चे जॉगिंग, आहारावर प्रचंड नियंत्रण ( पाव नाही ! मैदा नाही ! स्वीटस नाही ! बेकरी पदार्थ नाही ! ) सुरुवातीचा महिनाभर रोज ५०० दोरीच्या उड्या आणि जून पर्यंत वाढवून १००० दोरीच्या उड्या प्रत्येक दिवशी ! ऊन-पाऊस-थंडी ची फिकीर न बाळगता माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त एकच टार्गेट होते ! आपल्या देशात गुरू ला खूप महत्त्व आहे - कोणालातरी गुरू मानणे ह्याशिवाय सफलता मिळू शकत नाही हे तर निश्चित !
त्यामुळे माझ्या मित्रमंडळींच्या कंपू मध्ये मला motivation मिळाले आणि "गुरु"  देखिल ! (गुरुजी) -- त्यांचे विशेष आभार !

६८.४ चे टार्गेट ३ महिन्यात पुर्ण करून १५ जून २०१७ - मध्ये फेसबुकवर परतलो... !! आता मुख्य काम आहे Maintenance चे !
२०१७ ते २०१८ --> स्वतःच्या २ फोटोमधला चांगला फरक ठळक दिसेल हे पाहायचे !

वेताळ पंचविशी मधली ७ वी पायरी चढून झाले....मागच्या प्लॅन च्या success rate नुसार मागील पानावरून पुढे सुरू ठेवणे जास्त लाभदायक आहे ! त्यामुळे वेगळे काहीही लिस्ट न बनवता जो होगा देखा जायेगा.....कधी समजा ताकद कमी पडलीच तर म्रुत्युंजय मंदिर आहेच जवळ !!

ॐ नम: शिवाय !!