Monday, July 29, 2019

CLUB 34 😊😊

"दीक्षित, उभा रहा आज युनिफॉर्म का नाही??"
मॅडम आज माझा वाढदिवस आहे 😊 मी चोकोलेट्स पण आणली आहेत वाटायला, देऊ का आत्ता!?
"बरं बरं, शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या, पण आत्ता नको, पुढच्या तासाला वाटा."

हा किस्सा माझ्या आठवणीतल्या जाणता वाढदिवसचा, बालपणाचा काळ सुखाचा म्हणतात ते खरचं पुन्हा अनुभवायला मिळत आहे😊 गेली काही वर्षे शाळकरी जीवन, मग महाविद्यालयीन आणि मग नोकरी ह्यामध्ये एका ठरलेल्या Prototype मध्ये वाढदिवस झाला, 
रात्री 12 वाजता मित्र केक आणणार,तो तोंडाला फासणार, आई बाबा सकाळी औक्षण करणार आणि एक पाकीट हातात ठेवणार, तेच पाकीट मग संध्याकाळी मित्र परिवाराला एकत्र घेऊन एखाद्या हॉटेल,टपरी वर अर्धे होणार आणि उरलेले अर्धे तसेच ड्रॉवर मध्ये ठेवून देणार कधी लागले तर म्हणून.....

दर वर्षी वाढणाऱ्या मित्र-मैत्रिणीच्या संख्येवरून वर्ष एकंदरीत चांगले गेले हे समजते, काही कटू प्रसंग आले पण ते म्हणतात ना, सगळं चांगलं होत असताना कुठेतरी काहीतरी वाईट घडण्याचा/घडवण्याचा प्लॅन सुरु असतो - असो हे असे प्रसंग खुद्द राम, कृष्ण, अर्जुन, राजा विक्रम, ह्यांनाही चुकले नाहीत मग मनुष्य जन्मात आपल्याला कसे चुकतील। आपल्या आंतरिक शक्तीने त्यावर मात करून पुढे जाणे आपल्या हाती आणि त्यासाठी वेळोवेळी योग्य शक्ती मिळत जाते 👍👍


तर, ह्या वर्षी मी 34 वर्षांचे झालो 😊 मनाने अजूनही 24 आहे आणि कायम राहो हि इच्छा,  गेल्या वर्षीच पुत्र-रत्न प्राप्तीनंतर ठरवले होते कि आता वय कितीही वाढत जावो, पण आपल्या मुलासोबत आपण कायम यंग राहिले पाहिजे।

गेलं 1 वर्ष analysis मध्येच गेले कि असे करायचे म्हणजे नक्की काय काय करावे लागेल।

रोज किमान 5 km पळावे लागेल, घरभर गुडघ्यावर रांगावे लागेल, 100 वेळा शिताफीने उठ बस करावे लागेल, immunity वाढवावी लागेल, old classics सोबत yo yo honey singh सुद्धा ऐकावा लागेल, माझ्या लहानपणी केल्या गेलेल्या खोड्या पुन्हा मुलगा पण करताना पाहून पुन्हा त्याच काका काकूंच्या त्याच त्याच शिव्या खाव्या लागतील, पुन्हा 19, 17 आणि 23 ते 29 चे पाढे पाठ करावे लागतील, कैऱ्या,आवळे,चिंच तोडून खाण्यात जी मजा आहे ती मुलाला अनुभवण्यासाठी कृषी पर्यटन करावे लागेल(कारण आता तशी झाडे आणि माणसे बसल्याठिकाणी मिळणे कठीण आहे), हेअरस्टाइल,कपडे,वागणे-बोलणे कुठेही वयस्कर वाटणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल।

अर्थात हे कठीण आहेच पण अशक्य नक्कीच नाही, 
So much to do....in so little time, हे IT INDUSTRY मध्ये आल्यावर खरेच वाटते कारण काम संपत नाही.... कधीच नाही, तुम्हालाच त्या त्या दिवसाचा उरक थांबवावा लागतो। उद्या साठी।

Tomorrow never comes असे म्हणणारा माणूस देखील उद्या साठी काहीतरी साठवून जोडून ठेवत असतो।  माझ्या मते "उद्या" हा येणारा दिवस नसून आशा असते, A Hope... that you may get another chance...

आजवर जेवढे वाढदिवस केले ते सगळे ह्याच हिशेबात कि आपण काय कमावले आणि काय गमावले,
 इथून पुढे मात्र आपण काय आत्मसात केले आणि काय pass on केले ह्याचाच ताळेबंद राहील 👍

आजवर कायम माझ्या वाढदिवसाला आवर्जून फोन करणार्या, भेटणाऱ्या मंडळींना सप्रेम 😊, तुमच्यामुळे हा दिवस special होतो। असेच प्रेम राहू द्या, वृद्धिंगत होऊ द्या ।

गद्धेपंचवीशी,वेताळपंचवीशी सगळे मागे टाकून आता फक्त सुलतान, odin alfather, दंगल (महावीर सिंग),  ह्यांच्यावर फोकस करून आम्ही एक गाणे सार्थ करायचा प्रयत्न करणार आणि तोच वारसा पुढे pass on करणार😊

 "पापा कहते थे बडा नाम करेगा.....बेटा हमारा ऐसा काम करेगा"


पुढील वर्षी आठवणीने घरी या, मुलाचा 2nd आणि माझा 25th B'Day साजरा करायला 😊💐🎂




Monday, May 27, 2019

चित्रपट परीक्षण - PM MODI



१९८५ नंतर जन्मलेल्या पिढीने नरेंद्र दामोदरदास मोदींच्या रूपाने उत्तम बोलणारा पंतप्रधान पहिल्यांदाच अनुभवला...!


PM MODI हा सिनेमा तुम्हाला मोदी कसे घडत गेले हे दाखवतो.








जमेच्या बाजू-

१  मोदींचे सुरुवातीचे जीवन अत्यंत वेगाने दाखवले आहे, त्यामुळे सिनेमा रटाळ होत नाही

२   मोदी ह्या एका नावामागे किती लोकांचे परिश्रम दडलेले आहेत ते सार्थपणे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अर्थातच लीडर चांगला हवाच पण टीम देखिल चांगली पाहिजे हे लक्षात येते.

३  आणीबाणीची परिस्थिती, दंगे धोपे दाखवताना त्याचा जेवढा परिणाम झाला पाहिजे तेवढेच दाखवले गेले आहे,

कुठेही रक्तपाताची किळस येत नाही किंवा अतिरंजित दाखवल्यासारखे वाटत नाही.

४  अगतिकतेतून होणारा मनस्ताप आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी केलेले प्रयत्न विवेक ओबेरॉय ला बऱ्यापैकी दाखवता आलेले आहेत.

५  सिनेमॅटोग्राफी आणि हिमाचल मधले देखावे खूपच सुंदर आहेत.

६  हा सिनेमा समजा पूर्वनियोजित ११ एप्रिल ला प्रकाशित झाला असता तर आज किमान अजून १०-१५ सिट वाढली असती हे नक्की



पडत्या बाजू-

१ - हा एक जीवनपट आहे आणि ज्या व्यक्तीवर हा बेतलेला आहे ती व्यक्ती आपल्या समोर २४ तास आहे, वेग वेगळ्या माध्यमांतून आपण रोज त्यांना भेटतो त्यामुळे - "तुलना" हि अटळ आहे ! ह्या एकाच वस्तुस्थितीमुळे माझा पहिला पडता मुद्दा हा आहे की सिनेमा हा, सिनेमा वाटतो.

टीव्हीवर जीवनपट किंवा नाट्यरूपंतर पाहतो तसा.

२- ह्या व्यतिरिक्त मला तरी काही खटकले नाही.



चित्रपट परीक्षण थोडक्यात :-


चित्रपट सुरू होतो तोच "मोदी चहा" पासून, वडिलांना मदत करून शाळेत जाणारा मुलगा - रेल्वे थांबून लोकं यायची वाट न बघता चहा घेऊन आत जाणारा, लोकांशी बोलणारा, ऐकणारा, समजून घेणारा. युद्धाच्या घोषणेनंतर रेल्वे ने जाणाऱ्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चहा देऊन पैसे नाकारणारा आणि सलाम करून भारत माता की जय ! अशी खणखणीत घोषणा देणारा बाल कलाकार हे पात्र चांगले रंगवतो !


तिरंगा पाहून सलाम करणारा मुलगा दुसऱ्या मुलाला समजवून सांगताना मस्त वाटते !! देशप्रेम हे उसने आणता येत नाही, त्यामुळेच जिवाची पर्वा न करता देशप्रेमाने सैन्यात भरती होणाऱ्या प्रत्येकाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.


रा‌.स्व.सं मध्ये जावे की सैनिक बनावे की साधू बनावे ह्या दोलायमान परिस्थितीत असणारा नरेंद्र, एका नाटकात हुंड्याविरोढी बोलतो, तेव्हा त्याला भेटणारे रा.स्व. सं चे वकिलबाबु. त्यांनी दिलेले १० पैसे ( कभी कभी किस्मत आजमा लेनी चाहिये )

मग गाईड चित्रपट पाहून हिमालयात स्वतःच्या शोधात निघालेला नरेंद्र, त्यामध्ये त्याला भेटणारे friend philosopher and guide आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश !!


रा.स्व. संघाचे काम खूप व्यापक आहे परंतु चित्रपटात ते जास्त दाखवणे शक्य नसल्याची कल्पना होतीच. जेवढे दाखवले आहे ते देखील सुंदर ! नितीन कार्येकर वकिलबाबू च्या भूमिकेत शोभतात !


> गर्व से कहों हम हिंदु है,

> एक भारत अखंड भारत - सर्व धर्म एकता यात्रा

> काश्मीर लाल चौकात तिरंगा फडकवणे,
(इथेच सैनिकांशी बोलतानाचा डायलॉग आहे --; देश के लिये जान हाजिर है, पर ये पॉलिटिशिअन्स की वजह से हमारे लोग शहिद होते है, हम कुछ कर नही पाते. - जिस दिन साहब हमारी सरकार ने हमारे हाथ खोल दिये ना... अंदर घुस के मारेंगे ! आणि सत्ता आल्यावर पहिल्यांदा जे काम केले ते म्हणजे आर्मी ला मोकळीक दिली दहशतवाद हटवण्यासाठी हे आपल्या लगेच लक्षात येत.. आणि इथपासून सुरू होतात त्या लोकांच्या टाळ्या)


RSS to BJP to INDIA ह्या Transformation मध्ये आवश्यक असलेले हे सगळे प्रसंग अत्यंत चांगल्या आणि सकारात्मक पद्धतीने दाखवलेआहेत.


एक एक युक्त्या करून राजकारणात जम बसवणे, लोकांना आपल्या बाजूने करून घेणे उत्तम दाखवले आहे - ह्या सगळ्ञासाठी तरी एकदा सिनेमा पाहायला हवा, जय-विरू, सेहवाग-सचिन आणि ह्यांच्यासारखीच सुपरहिट मोदी-शहा जोडी कशी बनते ते पडद्यावर पाहायला छान वाटते.


गोध्रा हत्याकांड, अक्षरधाम हमला, हे सगळे प्लॅन कुठून कसे केले गेले असावेत, एका राज्याला कोंडीत कसे पकडले जाते आणि त्यातून फक्त लोकांच्या विश्वासावर ते राज्य पुन्हा उभे राहते, ताठ मानेने Vibrant Gujraath समिट घेते, देश विदेशातील लोकांना त्यांचे डेव्हलपमेंट मॉडेल मान्य करावे लागते , आणि हे केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि जनतेच्या प्रतिसादाच्या जोरावर हे पाहून प्रत्येक राज्य असे उन्नत का होऊ शकत नाही असा साहजिक प्रश्न मनात येतोच !!


सिनेमातले काही काही डायलॉग आठवणीत राहतात उ. दा. - टाटांसोबतच्या कराराच्या वेळी, "वो क्या है ना सर, जो फैसाला एक मिनिट मे नहीं होता.. वो कभी नही होता !! "

बोमन इराणी ने रतन टाटा उत्तम रंगवले आहेत, ते पाहताना पुन्हा एकदा माझ्यातले "टाटा" प्रेम उफाळून आले...ONCE a TATA ... always a TATA - मी भाग्यवान समजतो की सुरुवातीच्या काळात मी टाटा कंपनीत काम केले जिथे नीतिमूल्य शिकवली गेली जी आजही कामी येत आहेत.


फकिरा, जख्म अभी है निले, देश नही झुकने दुंगा गाणी उत्तम !

शेवटची रॅली मध्ये अतिरेकी हमला होणार हे माहीत असताना केलेले तपास, पाठपुरावे अत्यंत उत्कंठावर्धक आहेत... १००% मार्क त्या ३० मिनिटांच्या शॉट ला ! काय होणार माहीत असूनही आपण जागेवर खिळून बसतो.


-

माझ्याकडून सिनेमा ला ५ पैकी ४ मार्क्स. - सगळ्या होऊ घातलेल्या टीम लीडर जमातीने पाहावा असा सिनेमा !