Monday, July 29, 2019

CLUB 34 😊😊

"दीक्षित, उभा रहा आज युनिफॉर्म का नाही??"
मॅडम आज माझा वाढदिवस आहे 😊 मी चोकोलेट्स पण आणली आहेत वाटायला, देऊ का आत्ता!?
"बरं बरं, शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या, पण आत्ता नको, पुढच्या तासाला वाटा."

हा किस्सा माझ्या आठवणीतल्या जाणता वाढदिवसचा, बालपणाचा काळ सुखाचा म्हणतात ते खरचं पुन्हा अनुभवायला मिळत आहे😊 गेली काही वर्षे शाळकरी जीवन, मग महाविद्यालयीन आणि मग नोकरी ह्यामध्ये एका ठरलेल्या Prototype मध्ये वाढदिवस झाला, 
रात्री 12 वाजता मित्र केक आणणार,तो तोंडाला फासणार, आई बाबा सकाळी औक्षण करणार आणि एक पाकीट हातात ठेवणार, तेच पाकीट मग संध्याकाळी मित्र परिवाराला एकत्र घेऊन एखाद्या हॉटेल,टपरी वर अर्धे होणार आणि उरलेले अर्धे तसेच ड्रॉवर मध्ये ठेवून देणार कधी लागले तर म्हणून.....

दर वर्षी वाढणाऱ्या मित्र-मैत्रिणीच्या संख्येवरून वर्ष एकंदरीत चांगले गेले हे समजते, काही कटू प्रसंग आले पण ते म्हणतात ना, सगळं चांगलं होत असताना कुठेतरी काहीतरी वाईट घडण्याचा/घडवण्याचा प्लॅन सुरु असतो - असो हे असे प्रसंग खुद्द राम, कृष्ण, अर्जुन, राजा विक्रम, ह्यांनाही चुकले नाहीत मग मनुष्य जन्मात आपल्याला कसे चुकतील। आपल्या आंतरिक शक्तीने त्यावर मात करून पुढे जाणे आपल्या हाती आणि त्यासाठी वेळोवेळी योग्य शक्ती मिळत जाते 👍👍


तर, ह्या वर्षी मी 34 वर्षांचे झालो 😊 मनाने अजूनही 24 आहे आणि कायम राहो हि इच्छा,  गेल्या वर्षीच पुत्र-रत्न प्राप्तीनंतर ठरवले होते कि आता वय कितीही वाढत जावो, पण आपल्या मुलासोबत आपण कायम यंग राहिले पाहिजे।

गेलं 1 वर्ष analysis मध्येच गेले कि असे करायचे म्हणजे नक्की काय काय करावे लागेल।

रोज किमान 5 km पळावे लागेल, घरभर गुडघ्यावर रांगावे लागेल, 100 वेळा शिताफीने उठ बस करावे लागेल, immunity वाढवावी लागेल, old classics सोबत yo yo honey singh सुद्धा ऐकावा लागेल, माझ्या लहानपणी केल्या गेलेल्या खोड्या पुन्हा मुलगा पण करताना पाहून पुन्हा त्याच काका काकूंच्या त्याच त्याच शिव्या खाव्या लागतील, पुन्हा 19, 17 आणि 23 ते 29 चे पाढे पाठ करावे लागतील, कैऱ्या,आवळे,चिंच तोडून खाण्यात जी मजा आहे ती मुलाला अनुभवण्यासाठी कृषी पर्यटन करावे लागेल(कारण आता तशी झाडे आणि माणसे बसल्याठिकाणी मिळणे कठीण आहे), हेअरस्टाइल,कपडे,वागणे-बोलणे कुठेही वयस्कर वाटणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल।

अर्थात हे कठीण आहेच पण अशक्य नक्कीच नाही, 
So much to do....in so little time, हे IT INDUSTRY मध्ये आल्यावर खरेच वाटते कारण काम संपत नाही.... कधीच नाही, तुम्हालाच त्या त्या दिवसाचा उरक थांबवावा लागतो। उद्या साठी।

Tomorrow never comes असे म्हणणारा माणूस देखील उद्या साठी काहीतरी साठवून जोडून ठेवत असतो।  माझ्या मते "उद्या" हा येणारा दिवस नसून आशा असते, A Hope... that you may get another chance...

आजवर जेवढे वाढदिवस केले ते सगळे ह्याच हिशेबात कि आपण काय कमावले आणि काय गमावले,
 इथून पुढे मात्र आपण काय आत्मसात केले आणि काय pass on केले ह्याचाच ताळेबंद राहील 👍

आजवर कायम माझ्या वाढदिवसाला आवर्जून फोन करणार्या, भेटणाऱ्या मंडळींना सप्रेम 😊, तुमच्यामुळे हा दिवस special होतो। असेच प्रेम राहू द्या, वृद्धिंगत होऊ द्या ।

गद्धेपंचवीशी,वेताळपंचवीशी सगळे मागे टाकून आता फक्त सुलतान, odin alfather, दंगल (महावीर सिंग),  ह्यांच्यावर फोकस करून आम्ही एक गाणे सार्थ करायचा प्रयत्न करणार आणि तोच वारसा पुढे pass on करणार😊

 "पापा कहते थे बडा नाम करेगा.....बेटा हमारा ऐसा काम करेगा"


पुढील वर्षी आठवणीने घरी या, मुलाचा 2nd आणि माझा 25th B'Day साजरा करायला 😊💐🎂