Thursday, November 26, 2015

अ-सहिष्णू दहशतखोर - (माझ्या चश्म्यातुन) !!

बायकोला ऑफिसला सोडून परत घरी येत होतो...  
एका हॉल शेजारून जाताना वस्स्कन " भ्याँं....." असा आवाज आला... काय घाबरलो राव मी ! 
मला वाटलं अलिफ़ लैला, हातिमताई मध्ये असतो तसा जीनं किंवा राक्षस प्रकट होतो की काय !! घाबरल्यामुळे गाडी आपोआप रस्त्याच्या कडेला आलेलीच होती, म्हणून स्टँड वर लावणार  इतक्यात परत तोच भयानक आवाज !!!

कसाबसा धीर करून हॉल मधून आत डोकावलो तर अनेक वेगवेगळ्या वयाची आणि आकाराची माणसे योगासने करत होती आणि त्यात सिंह-मुद्रा आसनप्रकाची प्रॅक्टिस करत होते !! आवाजाहून भेसूर होत जाणार्या  त्यांच्या मुद्रा पाहता मी तिथे एक क्षणभर न थांबता लागलीच बाहेर पडलो !!

मला एक कळत नाही, समोरच्याला घाबरवण्यात असा काय आनंद मिळतो   ? हे गायक लोक, योगासनं करणारे, पहाटे ४-५ ला रस्त्यावर चक्कर मारत व्यायाम करणारे लोकं, सर्वसाधारण आजूबाजूच्या लोकांना आपली भीती वाटू नये ह्याची काळजी घेऊन अंग/तोंड विक्षेप का करत नाहीत ??

एखादे अत्यंत थकलेले आजी आजोबा, आपल्या घराजवळ चक्कर मारायच्या ऐवजी २-३ फर्लांगभर लांब फिरायला जातात... बरं चालता चालता हातातल्या काठीला टेकून किंवा एखादी रिक्षा/गाडीचा आधार घेऊन असे काही उभे राहतात की समोरून येणाऱ्या माणसाच्या मनात १०१ विचार १ मिनिटात येऊन जावेत !! 
समजा तुम्ही त्यांना मदत करून इच्छितं स्थळी पोचवले (माणुसकीला धरून त्या वेळेत तुमचा किती वेळ गेला ह्याची तमा न बाळगता... )  तर दुसऱ्या दिवशी त्याच वेळी त्याच स्थळी तेच गृहस्थ/आजीबाई तुमची अगदी वाट पाहत असल्यासारखे दिसतात   !  

कधीतरी तुम्हाला बाहेरगावी जाताना पहाटेच उठावे लागते, हातात एक आणि पाठीला एक अश्या बॅग घेऊन आपण बस/रिक्षा शोधण्यासाठी फुटपाथवरून चालताना समोरून येणारे कर्नल/डॉक्टर/VRS घेतलेल्या लोकांच्या पैकी एखादा इतके हातवारे करत येत असतो की आपण स्वत:हून बाजूला होऊन हा रणगाडा आधी जाऊदे मग आपण जाऊ हा पवित्रा घेतो !

मध्यम-वयातली लोक उगीचच सरळ चाल, उलटे चाल, मोठ्ठे मोठ्ठे श्वास घे...घाम न पुसता तसेच इकडे तिकडे फिरणे... असे करून लक्ष वेधून घेत असतात...

सगळ्यात मोठा ताप म्हणजे खिशात कालची शिळी पोळी, घरात उरलेले न खपलेले बिस्किटांचे तुकडे घेऊन सर्व भटक्या कुत्र्यांचे माय-बाप होण्याचा प्रयत्न करणारे लोक !!
हि कुत्री महानगरपालिकेची श्वानपथक गाडी अशी underground होतात की जणू कंप्लेंट केलेल्या माणसालाच तो ठेकेदार शिव्या देणे बाकी ठेवतो... पण सकाळचे हे माय-बाप लोक आले की सगळी गँग जमा होते.... 
पुढे ३ मागे ४ असे लटांबर घेऊन दर ३०० मीटरमागे १-२ बिस्किटे फेकत ह्या लोकांचा ताफा पुढे जात असतो.... बरं, बिस्किटे तरी भरपूर आणावी... ते हि नाही, १ पुडा संपल्यावर पुन्हा ही गँग बेवारस होते... आणी मग काय विचारू नका.

दुधासाठी जाणारे, ऑफिसला जाणारे, ज्या कोणाच्या हातात पिशव्या दिसतील त्यांच्या मागे सगळी हुंगत फिरायला लागतात... 
माझ्या मते आधारासाठी वापरण्यात येणाऱ्या काठीची सुरुवातच ह्या मल्टिपर्पस योजनेतून झाली असावी !

जी गत सकाळी, तिच संध्याकाळी....तुम्ही ज्या रस्त्यावरून जाणार त्याच्या बरोब्बर समोरून एखाद्या दारूच्या गुत्त्यावरून सुटून तर्राट झालेला माणुस झिंगत झिंगत येत असतो...... आता हे हेलिकॉप्टर नेमकं आपल्यावरच क्रॅश लँडिंग करणार ह्या भीतीने लोक रस्ताच बदलतात.... ! बायका-पोरी तर ही पिडा जाईस्तोवर सरळ एखाद्या शेजारच्या दुकानात घुसून उगीच काहीतरी घेतल्या-बघितल्यासारखं करतात  . आणि बाकी लोक शेवटच्या सेकंदात लिफ्ट बंद होताना जसे पटकन आत घुसतो तसे चटकन त्याला चुकवून पुढे जातात. !

ह्याव्यतिरिक्त अजून घाबरवणाऱ्या लोकांमध्ये, लाल सिग्नल असतानाही मोटारसायकलची ऍक्सलेटर पिळत उगीचच आत्ता उडवू की नंतर उडवू असे आविर्भाव करणारे लोकं, सिग्नल लागला रे लागला की पावती पुस्तक आणि पेन झटकत पुढे येणारा ट्राफिक हवालदार, उगीचच टेहळणी करण्याचा भाव आणणारा भंगारवाला / फेरीवाला, आपण मेडिकल टेस्ट किंवा X-RAY काढल्यावर तो परत देताना विनाकारण उघडून बघत चित्र-विचित्र सुस्कारे टाकणारे रिसेप्शनिस्ट्स, आजच्या एपिसोडमध्ये कोणता सामाजिक मुद्दा कश्या प्रकारे सीरियल मध्ये गोवला जाईल हा विचार करणारा कथेचा लेखक इ. इ. !

एकूण काय तर असले असंख्य आधुनिक अ-सहिष्णू दहशतखोर आपल्या आजूबाजूला फिरताना भीती वाटणे हे साहजिकच आहे ...  ह्यावर उतारा म्हणून एकवेळ "विषय" सोडू असे म्हणणे ठीकं आहे पण देश सोडू म्हणणे म्हणजे अगदी काहीही हं श्री होतयं !! 

Wednesday, November 25, 2015

एकतीशी कडे वाटचाल.....

नेमेची येतो वाढदिवस"... लोकांसाठी एक वर्ष पण खऱ्या अर्थाने झालेली वाढ हि फक्त स्वतःला माहित असते !! तसे मागच्या वर्षीपासुनच (तिशीमध्ये आल्यावर) एकतिसाव्या वर्षात पदार्पणाबद्दल मनात खुप सारे विचार होते, त्या विचारांच्या तंद्रित एक छोटीशी लिस्ट देखिल बनवली होती मी, की ३० Things before i turn ३० !! 

त्यातल्या बहुतांश तर पुर्ण केल्या आहेत काही बाकी राहिल्यात, पण सगळ्याच योजना पुर्ण झाल्या तर नवीन योजना बनवण्याची गम्मतच निघून जाईल... त्यामुळे ज्या पुर्ण झाल्या त्यात थोडेसे माझे कसब, तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट आणि ज्या अपुर्ण राहिल्या ती "श्रीं"ची ईच्छा !! 

मागच्या वर्षभराचा लेखाजोखा मांडताना एक लक्षात आले की तिशी च्या सुरवातीलाच आपण बरीच नकारघंटा लावली होती,  AGE BAR, जॉब Change limitations, वगैरे.... ! 
पण अगदीच असे काही नाहिये, अनेक यशस्वी आणि मोठ्ठ्या लोकांनी त्यांच्या आयुष्य्याची सुरुवात तिशीनंतर केली आहे, उदाहरणार्थ - सिल्वेस्टर स्टॅलॉन(ऍक्टर). ओपरा विन्फ़्री (टॉक शो) ह्या लोकांना खरा सुर गवसला तो ३० वर्षांनंतरच !  एका ईटरव्यू मध्ये स्टॅलॉन म्हणाला होता की,  Remember, Its never too late to start something !!  
त्यामुळे आता पुन्हा आपला दिमाग जैसे थे वर आला आहे... आणि त्याच जिद्दीने आणि ध्येयाने पुढिल वाटचाल Positively  करणार  !!  

ह्या वर्षीचा वाढदिवस "एक उनाड दिवस" प्रेरित होता, कंपनीकडून "ADLABS IMAGICA" चे पास मिळालेले होते त्यामुळे संपुर्ण दिवस उनाडक्या करण्यात गेला,  मज्जा आली !!
एफ.एम रेडिओ च्य रेड एफ एम मधून सुद्धा -वाढदिवसासाठी फोन आला होता - felt very Special by Wifey's this effort !!  


मागच्या लिस्टप्रमाणे श्रेयस तळपदे, पुजा सावंत, अनिकेत विश्वासराव, राहुल सोलापुरकर आणि अश्या अनेक Celebrities ला भेटलो पण अशोक सराफ ह्यांच्याशी झालेली भेट आयुष्यभर लक्षात राहिल !!

ह्या वेळी वाढदिवसाचे मनोगत लिहायला खुपच वेळ लागला खरा. . . . Matter तयार होता पण लेखन होत नव्हते... असो ह्या वर्षीप्रत्येक महिन्याला एक Article तरी लिहिणार आहे !! 

वेताळा, ठरवलेल्या गोष्टी निट पार पडुदे रे महाराजा.....
विघ्न दूर कर आणि लढायची ताकद दे रे महाराजा...... !!   (होय महाराजा !!!)