Tuesday, July 23, 2024

नेमेची येतो वाढदिवस

 
नेमेची येतो वाढदिवस,

ह्यावर्षी मात्र हा आला तो दशकस्थान बदलुन टाकायलाच :-)  पण आजवर सगळेच आणि सगळीकडेच "क्ष Years old" किंवा " क्ष वर्षे पुर्ण" असे लिहित असल्याने वास्तविक बदल होण्यासाठी आमच्याकडे अजुन ३६४ दिवस आहेतच...

रोज घडणाऱ्या चांगल्या गोष्टी लिहुन झाल्या, वजन कमी करुन झाले,  विसरलेल्या मित्रांना फोन करुन झाले, व्यसने सोडुन झाली(म्हणजे चहा,सोशल मिडीया वगैरे ची... आपल्याला तेवढीच आहेत) - आता ह्या वाढदिवसापासुन नविन काय करायचे  बाकी आहे ह्या विचारातच खुप वेळ गेला :-) पण असे खुप भारी काही सापडले नाही त्यामुळे मागे ठरवले होते तसेच -TAKE LIFE AS IT COMES.... चे सुत्र पुढे सुरु ठेवेन.


तसे QUICK RECAP करायचे म्हटले तर मागील पुर्ण वर्ष खुपच पटकन संपले (FAST ह्या अर्थी),  ह्यावर्षी बर्याच नविन गोष्टी अनुभवल्या गेल्या.... आधिची सहामाई ऑफ़िस चे काम आणि हॉस्पिटलायझेशन ..... अनेक ठिकाणी होणारे Downsizing and layoffs च्या दुष्टचक्राचे जनक देखील ह्याच कंपन्या आहेत ज्यांनी कोविड काळात वारेमाप पॅकेजेस वाटली होती. असो, कामावर प्रेम करा - काम सलामत तो कंपनी हजार !

जवळजवळ चार सहा महिने ह्या सगळ्याचा जो IMPACT झाला, त्यामुळे कामात बिझी गेला. त्यानंतर म्हणजे साधारण एप्रिल पासुन पुढे, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजवर "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल" जे जे वाचले, ऐकले, पाहिले, ते सम्पुर्ण नव्याने जगायला मिळाले - "जयोस्तुते" ह्या सावरकरांच्या जीवनावर आधारित नाटकाच्या सादरीकरणाच्या प्रयोगामध्ये अनेक नवोदित कलाकारांप्रमाणे मलाही संधी मिळाली - आणि त्यातही ३ भूमिका मिळाल्याने अजुनच विशेष :) 

गेले ३ महिने कसुन नाटकाच्या तालमी झाल्या, अनेक नविन ओळखी झाल्या प्रत्येकाकडुन काही ना काही शिकण्यासारखे होते - भरत नाट्य रंग मंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ह्या दोन्ही ठिकाणी केवळ प्रेक्षक म्हणुन गेलो होतो - नाटकाचा भाग होताना खुप आनंद झाला.

 


दुसरे म्हणजे - अनेको वर्षांनी पुन्हा एकदा AMDOCS आणि लीला पुनावाला फ़ौंडेशन तर्फ़े काही विद्यार्थीनींना "PERSONAL BRANDING" बद्दल मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. कॉलेज च्या शेवटच्या वर्षी शिकणाऱ्या ह्या मुलींना Corporate Employability Program अंतर्गत "जॉब रेडी" रहाण्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते सारे मार्गदर्शन आमच्या कंपनीतल्या माझ्या सारख्या अनेकांकडुन केले गेले



आणि हे सगळे UNPLANNED होते कदचित त्यामुळेच जास्त आनंददायी होते.  देव करो आणि असे आनंद मिळतच राहो !!

जय श्रीराम !!




Friday, July 23, 2021

वाढदिवस स्पेशल....।

*वाढदिवस* 

म्हणजेच जन्मदिवस साजरा करणे, अर्थात कंट्रोल नसलेला वय हा एक भाग सोडला तर सामाजिक, राजकीय, अर्थिक, बौद्धिक आणि वैचारिक वाढ करणे ही संपूर्णपणे आपल्या हातात असते, आणि दरवर्षी तेच खरे तर अपेक्षित असते....त्याव्यतिरिक्त हा दिवसही बाकी दिवसांसारखाच असतो😊 फक्त हे आपल्याला कालांतराने कळते.


शाळेत असताना वाढदिवसाला चॉकलेट गोळ्या वाटल्याने आठवते ना....कळत होतं तेंव्हा काही? बाकीचे वाटतात म्हणून आपण पण वाटायचे, अगदी आई बाबानां हट्ट करून... थोडं मोठं झाल्यावर पॉकेटमनी मागून, किंवा ओवाळल्यावर दिलेल्या पैशातून मित्राना घेऊन पार्टी करणे ते ही असेच.....त्यातले थोडे कॉलेज ला गेल्यावर सुद्धा चालू राहायचे फरक फक्त हा पडायचा की कॉलेज मध्ये गेल्यावर part time delivery/per day promotions/assistant किंवा तत्सम चुटुक पुटुक कामे करून मिळवलेली स्वकमाई देखील खर्ची घालता यायची ( तेंव्हा हा पैसा आमचा पूर्ण ब्लॅकमनी होता बरं का ...कारण घरी काही असं सांगायची सोय नव्हती, कॉलेज ला अभ्यासाला जावे एवढीच माफक अपेक्षा होती)


काही मित्र शाळेपासून चिकटलेले ते वेगळे झालेच नाही नंतर पुढे अजून मित्र मैत्रिणी मिळत गेले ते देखील काही गेले काही टिकले...त्यातही 2, 3 खास असतात त्यांच्या वाढदिवसाला किंवा त्यांनी आपल्या वाढदिवसाला आवर्जून 12 ला सगळ्यात आधी wish करतात 😊

त्यासाठी म्हणून केल्या जाणाऱ्या जुगाड मध्ये सगळ्यात जास्त आठवणीत राहणारा किस्सा म्हणजे त्या माणसाला 11 वाजल्यापासून फोन करून busy ठेवणे, दुसऱ्या कोणाचा आला तर जाऊदे waiting वर आपले काम तर झाले 😊,


दुसरा किस्सा म्हणजे वाढदिवसाला सगळ्यात आधी wish करायला नाही जमले तर अगदी शेवटी आठवणीने रात्री 11,55 ला फोन करून wishes द्यायच्या ....थोड्या शिव्या मिळतात पण काहीतरी  वेगळे/स्पेशल केल्याचे समाधान दोन्ही बाजूंना 😊


तिसरा किस्सा म्हणजे आमचे अनेक थोर,जुगाडू मित्र...शकुनी मामा चे फासे कसे त्याच्या तालावर नाचायचे तसेच ह्या मित्रांचे वाढदिवस नाचायचे....पटेल असे सांगतो, समजा क्लास किंवा कॉलेज ला एखादी नवीन ऍडमिशन झाली आणि आपल्याला इंटरेस्टिंग वाटली तर intro होईल त्याच्या next month मध्ये सोया बघून ह्यांचा वाढदिवस यायचा😊 ,कधी कधी अगदी वर्षात 2-3 सुद्धा व्हायचे 😊आणि ह्यामध्ये भेदभाव नाही बरं का....हा जुगाड मुलं असो वा मुली सगळे करायचे आणि हे असं केलंय हे समजेपर्यंत त्या 2 लोकांचं ट्युनिंग बर्यापैकी जमलेलं असायचं...


Belated wishes अर्थात वाढदिवस विसरल्यानंतर केला जाणारा जुगाड,पण त्यात काय मजा नव्हती दोन्ही बाजूंना माहीत असायचे की ही केवळ औपचारिकता आहे....आणि निम्याहून जास्त वेळा हे एकदाच होते त्याच्या पूढील वेळी तर wishes ला reply देखील दिला जात नाही


आता नोकरीच्या ठिकाणी cakes meeting मध्ये  3-4 लोकांचा एकत्र केक कापणे, contribution काढून गिफ्ट देणे , बोनस क्लब पॉईंट्स जमा करणे वगैरे प्रकार असतातच... 


 कित्येक लोकांसाठी तर ठरलेला दिनक्रम असतो की वाढदिवसाला ऑप्शनल किंवा फॅमिली डे ची सुट्टी टाकायची, दिवसभर लोळायचं किंवा फिरायला रिसॉर्ट ला जायचं, दोन्ही तिन्ही वेळी हॉटेलमध्येच खायचे, रात्री मित्रांसोबत बसून celebrate करायचे आणि मग मध्यरात्री पान वगैरे खाऊन झोपायचे, आला दिवस,गेला दिवस ☺️


काही लोकं नवीन नित्यक्रम करायचे चंग बांधतात, ते पूर्ण होतच नाहीत मग ते प्रकल्प तसेच ठेऊन वरची वर्षे फक्त खोडुन नवीन करत राहतात 👍



आणि उरलेली काही माझ्यासारखी....

               जी आजही मोजक्याच पण जुन्या खास मित्रांच्या सहवासात रात्री 12 वाजता वाढदिवस सुरु करतात, सकाळी दुपारी मस्त तयार होऊन आवर्जून आई आजी बायको कडून ओवाळून घेतात, काही ओळखीच्या जुन्या आजी-आजोबा-काका-मामा जे जवळपास राहतात त्यांना नमस्कार करून विचारपूस करून येतात, सामाजिक बांधिलकी पाळत एखादे झाड लावुन ते वाढवून टिकवून जगावतात किंवा रक्तदान करतात किंवा कोणत्याही पद्धतीने असो अगदी एखाद्याची गाडी ढकलणे, किंवा बस पकडायला मदत करणे किंवा एखाद्या वयस्कर माणसाला रस्ता क्रॉस करून देणे, समान उचलायला मदत करणे वगैरे ..करून समाजाचे देणे थोडे फार फेडतात, जमेल तसा तितका दान-धर्म करतात, वय आणि फिटनेस ह्याचा घोळ न होऊ देण्यासाठी आपलीच जुनी रेकॉर्ड्स मोडण्याचा किंवा जपण्याचा प्रयत्न करतात आणि विशेष म्हणजे दिवसभराच्या तीनही प्रहरांत जे रोज करत नाही असे काहीतरी वेगळे नक्की करायचे...त्याने थोडे  आयुष्य वाढते म्हणतात...गेल्या 2-3 वर्षात सगळ्याच लोकांना त्याची खरी किंमत कळलेली आहे👍


असो, ह्यावर्षी क्लब 36, अर्थात 36 पूर्ण करून 37 कडे वाटचाल सुरु 😊 जे आहे ते आहे, उगीच ताकाला जाऊन भांड कशाला लपवा... दिल से जवान आणि आपापले छंद जपले की तुम्ही कायम Young राहणार हे नक्की ....आणि अगदीच कधी जाणीव व्हायला लागली तरीही आमच्या ग्रुप चा जो  TShirt बनवत आहे त्यावर छापलेली ओळ वाचली की कायम एक स्माईल देऊन जाते "Its not about AGE....its about Mileage💪," so put your shoes on👟 & get set go....🏃"


गेल्या वर्षी कोरोना ने माझ्या ओळखीतले खुप लोकं नेले,काही माझ्यापेक्षा थोडे मोठे, काही माझ्याएव्हढे, काही माझ्याहून लहान देखील त्या सर्वांना शांती लाभो ही प्रार्थना करतो,


avengers endgame पाहिलाय? टोनी स्टार्क - quick,witty,naughty, smart, intelligent आणि selfMade असल्यामुळे माझ्या आवडते कॅरेक्टर आहे, तो देखील टाइम ट्रॅव्हल करायच्या आधी एक मेसेज सोडून जातो, त्याचे हिंदी भाषांतर खूप चांगले केले आहे ते नक्कीच ऐका...असे वाटते की आपण सगळ्यांनी असे कधी न कधी, काही न काही रेकॉर्ड केलेच पाहिजे 😊


"वैसे मरने का कोई सही वक्त थोडी ना होता है....पर सोचा एक मेसेज रेकॉर्ड कर लु...क्यू की अगर टाइम से पहले गुडबाय हो जाये...तो.... अच्छी... बुरी..जैसी भी हो पर ये हमारी कहानी हमारे बचौ की विरासात है, और उन्हे इसि मे जिना सिखाना होगा.... पर शायद.. मै कुछ ज्यादा सोच रहा हु, सब ठीक हो जायेगा प्लॅन के हिसाब से....... I LOVE YOU 3000"


👍असो शेवट जास्त heavy न करता माझ्या सगळ्या हितचिंतक आणि हितशत्रूंना "कोणताही घ्या पण काळाची गरज ओळखून टर्म-लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घ्या" ही विनंती करून आजचा लेखनविषय संपवतो 👍


अनेक वर्षांनी आज गुरुपौर्णिमा आणि वाढदिवस एकत्र आले आहे, तरी दुर्मिळ गोष्टींचा जमेल तेवढा लाभ घ्यावा आणि भेटून जावे 👍 ते काय म्हणतात ना, "कृपा आनी शुरू हो जायेगी"... वगैरे वगैरे 😂🤣💪


बाकी गद्धेपंचवीशी नंतरची ही वेताळ पंचविशी सुरू असल्याने अनेकदा अक्राळविक्राळ राक्षस, जादु आणि चमत्कार पाहायला मिळतात पण वेताळाला भेटायचं तर हे सगळे केलेच पाहिजे ना 😊


आणि आता तर भीतीचे कामच नाही कारण वेदांत(माझा मुलगा वय वर्ष 3) हात पकडून म्हणतो "बाबा तू घाबरू नकोस, तुम्ही घाबरू नका, मी आहे मी भुताशी दंगल करून त्याला चित करून टाकेन"


आणि माझ्याकडे त्याला कौतुकाने उचलून 'लय भारी' म्हणण्याशिवाय पर्याय नसतो 👍👍👍






-

आशुतोष सदानंद दीक्षित

23 जुलै 2021