Tuesday, July 23, 2024

नेमेची येतो वाढदिवस

 
नेमेची येतो वाढदिवस,

ह्यावर्षी मात्र हा आला तो दशकस्थान बदलुन टाकायलाच :-)  पण आजवर सगळेच आणि सगळीकडेच "क्ष Years old" किंवा " क्ष वर्षे पुर्ण" असे लिहित असल्याने वास्तविक बदल होण्यासाठी आमच्याकडे अजुन ३६४ दिवस आहेतच...

रोज घडणाऱ्या चांगल्या गोष्टी लिहुन झाल्या, वजन कमी करुन झाले,  विसरलेल्या मित्रांना फोन करुन झाले, व्यसने सोडुन झाली(म्हणजे चहा,सोशल मिडीया वगैरे ची... आपल्याला तेवढीच आहेत) - आता ह्या वाढदिवसापासुन नविन काय करायचे  बाकी आहे ह्या विचारातच खुप वेळ गेला :-) पण असे खुप भारी काही सापडले नाही त्यामुळे मागे ठरवले होते तसेच -TAKE LIFE AS IT COMES.... चे सुत्र पुढे सुरु ठेवेन.


तसे QUICK RECAP करायचे म्हटले तर मागील पुर्ण वर्ष खुपच पटकन संपले (FAST ह्या अर्थी),  ह्यावर्षी बर्याच नविन गोष्टी अनुभवल्या गेल्या.... आधिची सहामाई ऑफ़िस चे काम आणि हॉस्पिटलायझेशन ..... अनेक ठिकाणी होणारे Downsizing and layoffs च्या दुष्टचक्राचे जनक देखील ह्याच कंपन्या आहेत ज्यांनी कोविड काळात वारेमाप पॅकेजेस वाटली होती. असो, कामावर प्रेम करा - काम सलामत तो कंपनी हजार !

जवळजवळ चार सहा महिने ह्या सगळ्याचा जो IMPACT झाला, त्यामुळे कामात बिझी गेला. त्यानंतर म्हणजे साधारण एप्रिल पासुन पुढे, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजवर "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल" जे जे वाचले, ऐकले, पाहिले, ते सम्पुर्ण नव्याने जगायला मिळाले - "जयोस्तुते" ह्या सावरकरांच्या जीवनावर आधारित नाटकाच्या सादरीकरणाच्या प्रयोगामध्ये अनेक नवोदित कलाकारांप्रमाणे मलाही संधी मिळाली - आणि त्यातही ३ भूमिका मिळाल्याने अजुनच विशेष :) 

गेले ३ महिने कसुन नाटकाच्या तालमी झाल्या, अनेक नविन ओळखी झाल्या प्रत्येकाकडुन काही ना काही शिकण्यासारखे होते - भरत नाट्य रंग मंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ह्या दोन्ही ठिकाणी केवळ प्रेक्षक म्हणुन गेलो होतो - नाटकाचा भाग होताना खुप आनंद झाला.

 


दुसरे म्हणजे - अनेको वर्षांनी पुन्हा एकदा AMDOCS आणि लीला पुनावाला फ़ौंडेशन तर्फ़े काही विद्यार्थीनींना "PERSONAL BRANDING" बद्दल मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. कॉलेज च्या शेवटच्या वर्षी शिकणाऱ्या ह्या मुलींना Corporate Employability Program अंतर्गत "जॉब रेडी" रहाण्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते सारे मार्गदर्शन आमच्या कंपनीतल्या माझ्या सारख्या अनेकांकडुन केले गेले



आणि हे सगळे UNPLANNED होते कदचित त्यामुळेच जास्त आनंददायी होते.  देव करो आणि असे आनंद मिळतच राहो !!

जय श्रीराम !!




No comments:

Post a Comment