"ए छोटू, अजून एक कटिंग.........."
एक पटले की, छोटू हे केवळ नाव नाही....तर वृत्ती आहे, आनंदी वृत्ती ! :)
--
आशुतोष दीक्षित.
९८२३३५४४७८
"एक दिन दुनिया बदल कर... रास्ते पर आयेगी.. आज ठुकराती है हमको....कल...." असे अर्धवट गुणगुणत एक १७-१८ वयाचा मुलगा माझ्या टेबल शेजारून फडके फिरवत गेला...
मी मागे वळून पाहिले, अर्धवट शर्ट इन केलेला, फुल जीन्स ची कापून हाफ केलेली पँट घालून मागच्या खिशांत टिशू पेपर चे बंडल आणि कमरेला २ फडकी लटकवत तो सगळ्या हॉटेलवजा टपरीत फिरत होता.... तो माझ्या जवळून गेला आणि नकळत मी ते उरलेले गाणे पूर्ण केले..
". आज ठुकराती है हमको....कल...... मगर शरमायेगी... हाल ए दिलं हमारा... जाने ना बेवफा ये जमाना...!"
मी हात वर करून हाक मारली "दोस्ता, जरा एक मिनिट... " !
गाणे म्हणत जाणारा तो पोरगा लगेच पुढे हजर झाला..."बोला साहेब".मी मागे वळून पाहिले, अर्धवट शर्ट इन केलेला, फुल जीन्स ची कापून हाफ केलेली पँट घालून मागच्या खिशांत टिशू पेपर चे बंडल आणि कमरेला २ फडकी लटकवत तो सगळ्या हॉटेलवजा टपरीत फिरत होता.... तो माझ्या जवळून गेला आणि नकळत मी ते उरलेले गाणे पूर्ण केले..
". आज ठुकराती है हमको....कल...... मगर शरमायेगी... हाल ए दिलं हमारा... जाने ना बेवफा ये जमाना...!"
मी हात वर करून हाक मारली "दोस्ता, जरा एक मिनिट... " !
"ऑर्डर द्यायचीये ती घे पण तुझे नाव काय आहे बाबा... " मी मोबाईल वर SMS टाईप करता करता विचारले...माझ्या शेजारी FB वर पडीक विशालच्या आयपॅड मध्ये हळूच डोकावत तो म्हणाला... "सब छोटू बुलाते, तुम्ही पन छोटूच बोलवा... "
तेवढ्यात सँडी बाइकवरून उतरून टेबल जवळ आला... ३ हाफ फ्राय, १ गोल्डफ़्लेक -- जल्दी ला... ! - सँडीने ऑर्डर सोडली, म्हणाला "स्टेटस कॉल" कॅन्सल झाला रे... बसा निवांत आता... ! ठीकं म्हणत तो मुलगा पुढे गेला, आणि आमच्या गप्पा चालू झाल्या,
- च्यायला, ह्यांना कंटाळा आला की कॉल कॅन्सल, आमची गोची फुकट, चांगला ६-७ ला घरी जाणार होतो, पण ह्या कॉल साठी तासभर थांबलो तर कॉल कॅन्सल... वैताग नुसता, विशाल ने एक उसासा टाकत त्याचे वाक्य पूर्ण केले ,"सोड रे... एक तास लवकर जाऊन करणार काय ? पाऊस पडतोय -गप्प नाश्ता कर, मग जा निवांत आणि आता आधी बडबड बंद कर" !!
हो तुम्ही काय लेकांनो.. सेटल झाला आहात घरी बायको आहे, गेल्या गेल्या गिळायला मिळेल - आम्हाला आधी रूम मध्ये पाय टाकायला जागा करावी लागते, मग बाकी सस्गळं....! -
माझ्या ह्या चोख उत्तरावर त्याने फक्त एक मोठ्ठे धुराचे रिंगण सोडले आणि विषय थांबवल्याची घोषणा केली !!
बिल देताना काउंटरवरच्या अशोकरावांना म्हणालो, रावसाहेब - हा नवीन पोरगा कोण ? भारी बिलंदर दिसतोय ....
अशोकराव म्हणाले, माझाच २ नंबरचा पोरगा आहे, अभ्यासात रस नाही त्याला त्यामुळे म्हणालोय की फक्त ग्रॅज्युएट हो, नोकरी नको तर धंदा सांभाळ पण डिग्री पाहिजे... आम्ही ४थी शिकून एवढे उभारले, तेव्हाच जास्त शिकता आले असते तर आज ४ हॉटेल काढली असती, पोरगा हुशार आहे, पण गल्ल्यावर बसण्याआधी फडक्याची सवय असेल तरच डोक्यात हवा न जाता नीट धंदा सांभाळू शकेल, मी म्हणालो मी सांगेन तसे वागावे लागेल - तर म्हणाला चालेल तुम्ही शिकवाल ते करतो पण अभ्यास नको ! म्हटलं हॉटेल चे ट्रेनिंग सुद्धा सुरू केलं पण ग्रॅज्युएट व्हायचंच...
अशोकराव म्हणाले, माझाच २ नंबरचा पोरगा आहे, अभ्यासात रस नाही त्याला त्यामुळे म्हणालोय की फक्त ग्रॅज्युएट हो, नोकरी नको तर धंदा सांभाळ पण डिग्री पाहिजे... आम्ही ४थी शिकून एवढे उभारले, तेव्हाच जास्त शिकता आले असते तर आज ४ हॉटेल काढली असती, पोरगा हुशार आहे, पण गल्ल्यावर बसण्याआधी फडक्याची सवय असेल तरच डोक्यात हवा न जाता नीट धंदा सांभाळू शकेल, मी म्हणालो मी सांगेन तसे वागावे लागेल - तर म्हणाला चालेल तुम्ही शिकवाल ते करतो पण अभ्यास नको ! म्हटलं हॉटेल चे ट्रेनिंग सुद्धा सुरू केलं पण ग्रॅज्युएट व्हायचंच...
मी म्हटलं - उत्तम ! ऑल द बेस्ट रावसाहेब, आवडलं आपल्याला तुमचं धोरणं, लगे रहो !
घरी येता येता मनात अनेक विचार घोळत होते, अशिक्षित अज्ञानी लोक म्हणवणारे बौद्धिक दृष्या असा विचार देखिल करू शकतात ? आणि तो छोटू ? एवढ्या तन्मयतेने काम करत होता, सगळी टपरी सांभाळत होता, आणि थोड्या दिवसांतच तो त्याच हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेला असेल. थोडक्यात काय परफॉर्मन्स बेस्ड प्रमोशनच म्हणायचे की !
आपल्या सगळ्यांमध्ये हा असा एक छोटू लपलेला असतो, नवीन काहीही शिकायचे असेल की तो छोटू आपसूक जागा होतो.. अर्थातच, ते नवीन शिक्षण आवडत असलेला छोटू फडके घेऊन कामाला लागतो आणि काम आवडत नसणारा छोटू फक्त अभ्यास नको, अभ्यास नको असे म्हणत बसतो !
शाळेत असताना घरचा अभ्यास घरी न करता शाळेतच मित्राच्या वहीतून पाहून आपला नंबर येण्याआधी पूर्ण करणारा छोटू, कॉलेजच्या सबमिशन्स मध्ये हमखास GT किंवा COPYCODE मुळे फाइल भिरकावली गेलेला छोटू, पहिल्या वहिल्या नोकरीत मिळालेला पगार अत्यंत काळजीपूर्वक घरी नेणारा छोटू (आता सगळे अकाउंट ट्रान्स्फरच असते), घरात लाख भांडणे झाली तरी शेजारी/बाहेरची माणसे भांडायला आल्यावर अंतर्गत बाबी विसरून एकदम "मोठू" होणारा छोटू, मित्रांसोबत पार्टी करूनही घरी समजले तर प्रॉब्लेम होईल ह्या भीतीने कायम 'लिमिटेड' राहणारा छोटू, घरातील भाजी/दळण/बिल भरणा इ. कामे बिनबोभाट पार पाडणारा छोटू, भावा/बहिणींच्या लग्नात 'नारायण' काय करेल, असे 'हाती घेऊ ते तडीस नेऊ' म्हणत धावपळ करणारा छोटू, आप्तेष्टांच्या आजारपणात काय बोलायचे ते न कळल्याने फक्त पायाशी बसून राहिलेला छोटू,
असे कितीतरी रोल पार पाडणाऱ्या आपल्या सगळ्यांमध्ये दडलेल्या ह्या छोटूला माझा मनापासून सलाम.
एक पटले की, छोटू हे केवळ नाव नाही....तर वृत्ती आहे, आनंदी वृत्ती ! :)
--
आशुतोष दीक्षित.
९८२३३५४४७८
Thanks to google.com for images - they are not mine:)
ReplyDelete