Tuesday, August 5, 2014

आम्ही आणि पोश्टर बॉइज.. !!

अनेक दिवसांनी ओव्हरऍक्टिंग नसलेला मराठी विनोदी चित्रपट पाहायला मिळालाय.....
एकदम रिलॅक्स, रेफ्रेश, आणि थोडासा  अंतर्मुख करणारा सिनेमा...म्हणजेच  पोश्टर बॉइज... !!


 पोश्टर बॉइज च्या प्रमोशन साठी जोरदार कँपेनिंग करणारी टीम रेडिओ सिटीच्या ऑफिस मध्ये येणार हे कळल्यावर त्यांना भेटण्याचे प्रयत्न चालू झाले...  SMS, कॉल्स, फेसबुकवरील प्रश्नोत्तरे... सगळे प्रकार केले, आणि अर्थातच त्या प्रयत्नांचे आणि आमच्या नशिबाचे फळ म्हणून आम्ही त्यांच्याशी आर जे शोनालीच्या स्टार कट्टा वर गप्पा मारायला पोहोचलो सुद्धा... !!





एकदम  DOWN TO EARTH टीम ला पाहून असे वाटले की अरे, हे तर आपल्यातलचे आहेत.

हरिहरन सोबत
 "ओ हो.. काय झालं ! " किंवा ...इथून धक्का तिथून धक्का" वर ठेका देणारे लेसली, किंवा श्रेयस/अनिकेत/पुजा  ह्यांच्यापैकी कोणीही  आपले बाउंसर्स घेऊन वर आले नव्हते... ते सगळे खाली गाडीजवळ उभे होते..... 
आलेल्या सगळ्या टीमने "स्टार"पणाचे कोणतेही दडपण येऊ न देता दिलखुलास आणिमोकळेपणाने गप्पा मारल्या, कथा कशी सुचली - सेट वर काय काय मजा झाल्या,
कोणा कोणाची मदत झाली हे सांगितल्यावर सगळ्यांचा एकच हशा पिकला....

मग सगळ्यांचे त्यांच्यासोबत फोटो काढायचा कार्यक्रम आणि मग  एका डान्स ग्रुप ने केलेला "पोष्टर बॉईज" च्या गाण्यावरील नाच पाहून आम्ही घरी परतलो !



ट्रेलर्स, टीम ला भेटल्यामुळे सिनेमाची उत्सुकता होतीच..... शनिवारी रात्री हाऊसफुल असल्याने हिरमोड होऊन परतलो, पण रविवार ची तिकिटे तेव्हाच काढली .... कारण पुन्हा त्याच तिकिटावर तिच निराशा नको  

एकाच गावातल्या ३ लोकांचे जत्रेत काढलेले फोटो  शासनाच्या नसबंदीच्या पोष्टरवर कसे येतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळं येतं आणि त्यातून ते मार्ग कसा काढतात - This is the crux of the story ! विषय साधाच आहे... परंतु बऱ्यापैकी व्यापक ठरू शकणारा आहे.

पण ज्या पद्धतीने तो  दिग्दर्शित केला आहे, पटकथा आणि संवाद लिहिले गेले आहेत, अचूक वेध घेणारी गाणी आणि ठेका लक्षात राहतो... तिघांचेही "टायमिंग" अगदी म्हणजे अगदी पर्फेक्ट जमलेले आहे.... २-३ विनोदांच्यावेळी तर अक्षरशः पुन्हा एकदा अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे- सचिन'च समोर आहेत असे वाटले इतके टायमिंग जुळलेले आहे !!!

साधेच प्रसंग दाखवताना देखील खूप छान बांधणी केलेली आहे, उ. दा - तातडीने जावयाला भेटायला जाणारे देशमुख - दिलीप प्रभावळकर गाडीने कट मारल्यावर मास्तरांना खिडकीतून कारण देखील सांगतात की जरा गडबडीत आहे बरं का मास्तर ! त्यांची ऍक्टींग ही नेहमीच अफलातून असते, "आबा" मदत करा म्हणत अर्जुन त्यांच्याकडे येतो आणि ते मदत करतात तेंव्हा नेहमीच मला मदत करणारे माझे आजोबा पण आठवले !  

 ह्रुशिकेश जोशी ने कमाल केलेली आहे -- मास्तर च्या रोल ला त्याने मस्त न्याय दिला आहे. काच फोडणाऱ्या अर्जुन च्या मित्राला -देवाने तुला दोन्ही मेंदू काय छोटेच दिले आहेत का रे विचारताना.... एकदम माझ्या ज्युनिअर कॉलेजमधल्या मास्तरांची आठवण आली...ते मराठी शिकवायचे आणि रोज कॉलेजला  २-२ बस बदलून साधारणं ५०एक किलोमीटर वरून यायचे... 
मास्तरांच्या बायको - नेहा जोशीने द्विअर्थी वाक्यांचाभडिमार करत कथेचा वेग कायम ठेवला आहे...
कुठेही अति वल्गर न होणारी काही काही डबलमिनींग ऐकताना तर हसून हसून पुरेवाट होते...इतकी की एक हशा संपेस्तोवर दुसरा डायलॉगही निघून जातो..

अनिकेत विश्वासराव म्हणजेच अर्जुन हा सिनेमाचा हीरो आहे, आणि तो वागतोही तसाच... उ. दा. - मुलीला छेडणाऱ्याला बेदम मारणारा, मुक्या फोटोग्राफेर सोबत डंबशेराज करत माहिती काढून  घेताना मेमरी कार्ड हा शब्द ओळखतो आणि सगळे टाळ्या वाजवून हसत असतानाच एक कानाखाली ठेवून :"चल पुढे सांग" म्हणणारा किंवा वैतागलेला असताना वाचेचा कंट्रोल सुटून रागाच्या भरात काहीही बरळत "नागड्याने" उपोषणाची घोषणा आणि तेंव्हाचा संपूर्ण सीक्वेन्स पाहायलाच पाहिजे !!!

IN ALL, फॅंटॅस्टिक कॉमेडी !! 

तसे बरेच "सामाजिक विषय आणि तात्पर्य" मांडले गेलेले आहे.. पण "आपल्या जवळचे लोकांची साथ असेल तर माणूस कितीही मोठ्या संकटातून सहज मार्ग काढू शकतो" हाच संदेश पटकन उचलला जातो !  तसेच सिनेमा फ़ुकट फोटोसेशन करण्याच्या सुविधा असलेले कार्निव्हल्स वगैरे पासुन सावधान करतो !! गाणी तर घरी जाईस्तोवर गुणगुणत राहाल अशी बनली आहेत... !

तिन्ही पोष्टर बॉइज, श्रेयस तळपदे, रेडिओ सिटी,आर. जे. शो शो शोनाली आणि संपूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद !!

Tuesday, July 22, 2014

तिशी आली रे..... !!


१०० वर्षांचे आयुष्य गृहीत धरले तरी एक त्रितीअंश संपले....त्यामुळे "आईस-बर्ग" झाल्यासारखे वाटत आहे, ३०% च वर दिसत आहे बाकी पाण्याखाली काय काय दडले आहे कोणास ठाऊक....


ब्लफमास्टर पाहिलायत ??
नाही माझा काहीही संबंध  नाहीये !!!

पण तुम्हाला तो डायलॉग आठवतोय का ? - बोमन इराणी अभिषेक ला विचारतो की,
" रॉय तुम्हे ऐसे कितने दिन याद है.... तुम्हारा १st जॉब, 1st सॅलरी, 1st सूट, 1st गाडी, जब तुमने पह्ली बार किसी को छुआ... चुमा....जब पहली बार तुम्हारा दिल धडका.... कितने ? ५ - १० - २० - ३० ?? - ३० ! -- ३०  special days रॉय....३० साल की जिंदगी और तुम्हे सिर्फ ३० दिन याद है...बाकी के दिनो का क्या हुवा रॉय ?

मी नेहमीच असे म्हणत आलोय की वय १-२५ गद्धेपंचविशी आणि त्यापुढे वेताळ पंचविशी !!
ह्याची सुरुवात कशी झाली त्याची थोडीशी गंमतच आहे.... लहानपणी कायम भुताची भीती वाटायची, थोडा मोठा झालो आणि झी हॉरर शो, आहट मधील खोटी भुते पाहून ती थोडी कमी झाली पण पूर्ण गेली नव्हती, तेव्हा कुठेतरी वाचले की वेताळ हा भूतप्रेतपिशाचाचा अधिपती = राजा आहे. आणि वेताळाची मंदिरे भारतभर पाहायला मिळतात, कारण वेताळ ही प्राचीन देवता आहे. वेताळ हा शिवभक्त असून शिवाने वेताळाला पिशाच्चाचे आधिपत्य दिलेले आहे. -मग म्हटलं डायरेक्ट वरचा जॅक लावावा, वेताळालाच प्रसन्न करून घ्यावे म्हणजे छोटी मोठी छाटछुट भुते आपल्या नादी लागायचीच नाहीत... !

विक्रम आणि वेताळ कथा वाचत मोठा झाल्यामुळे बेदम कष्ट केल्यावर वेताळ पावतो असेही वाटायचे, पण पहिल्या पंचविशीत अनेक वेळा दिशा मिळत नाही किंवा दिशा मिळाली तरी आपण त्या दिशेकडे जाण्यासाठी तेवढे फर्म नसतो (म्हणूनच गद्धेपंचविशी म्हणतात की काय) !! पंचविशी ओलांडल्यावरची गेली चार वर्षे हाच विचार करत भरपूर कष्ट करतोय, जी मिळेल ती संधी हापसतोय... थकलो किंवा दमलो हे एखाद्यावेळेस तोंडातून निघून जाते पण डोक्यातून नाही ! माझे टार्गेट मोठे आहे, त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार हे माहीत आहे...त्यामुळे मी माझ्या ट्रॅक वर काम करत राहतोय आणि वाट पाहत आहे !


कर्मण्ये वाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन-- असले काही मला तरी जमणार नाही, आपला मोटो "पसिना सुखने से पहले मजदूर को उसकी मजदूरी मिल जानी चाहिये" हाच आहे.... आणि तोच राहील, फक्त मजदूरी ईमानदारीने करत राहिले की झाले !!

अर्थात वेताळ समोर आल्यावर काय होईल नक्की माहीत नाही, पण विक्रमराजाचे प्रताप आठवून निदान हात जोडून ताठ उभा राहू शकेन...आजवर केलेली चांगली कामे त्याला ऐकवेन...प्रसन्न झाल्यास अफ़ाट बळ आणि अचाट जिद्द मागून घेईन.... आणि सांगेन की जमलंच तर पहिली २५ वर्षेच वेताळपंचवीशी म्हटली जाऊदे.. त्या काळात जेवढे करता येईल तेवढे करून घ्यावे... म्हणजे नंतर कितीही गाढवपणा (गद्धेपंचविशी) झाला तरी किमान लोक भूतकाळाला दोष देणार नाहीत !!


बायकोच्या साथीने २ वर्षे एकदम मस्त गेली , Its good to get married to the right candidate - लोकांच्या लग्नात केलेल्या मदतीचे पुण्य :)  ! आणि गृहलक्ष्मी प्रसन्न म्हणजे ALL IZ WELL' च नाही का...! :-)
 वाढत्या वयानुसार फ़ॅमिली संवाद वाढतो म्हणतात ते खरेच आहे...!   म्हणजे तो तसा कमी कधीच नव्हता... फ़क्त धावपळीत व्हायचा तो आता राउंड टेबल वर होतो ... !! ( आई-बाबांची ऑफ़िस ची धावपळ आणि त्याच वेळी प्रगती पुस्तकावर सही घेण्याची धावपळ मला चांगली आठवते आहे)  आणि सध्याच्या पॉझिटिविटीच्या बहरामध्ये आमचे घर देखील मोदी-फ़ाईड झाले आहे. घरातले डिसिजन्स आधी फ़क्त बोलणी करुन व्हायचे... आता सगळे एकत्र बसलेले असताना रितसर कागद पेन घेउन आखणी करुन, घरच्या संसदेत फ़ायदे तोटे मांडुनच कामाची टेंडर्स पास केली जातात ...  फ़क्त ऑफ़िसची कौतुकं काय घेउन बसलात....कधितरी घरी करुन बघा असे काम.... इथेही मस्त डिस्कशन्स होतात... :D

संपुर्ण वर्षाचे गुणपत्रक मांडायची वेळ आली तेंव्हा फक्त दरवर्षी वाढलेल्या पगाराच्या लेटर चा उपयोग नसतो, पण वर्षभरात किती माणसे जोडली, किती लोकांच्या अडचणीत कामी आलो, कितीवेळा स्वतःचा विचार सोडून कामे केली , कोणा कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकलो ह्या सगळ्याची बेरिज आणि त्यातून दुखावलेल्या मनांच्या संख्येची वजाबाकी केल्यावर संख्या शुन्यापेक्षा जास्त राहीली पाहिजे !

मला समाधान आणि अभिमान आहे कि ह्या गोळा-बेरजेच्या खेळात मी कायमच +ve गुणांकामध्ये राहिलो आहे !!

१०० वर्षांचे आयुष्य गृहीत धरले तरी एक त्रितीअंश संपले....त्यामुळे "आईस-बर्ग" झाल्यासारखे वाटत आहे, ३०% च वर दिसत आहे बाकी पाण्याखाली काय काय दडले आहे कोणास ठाऊक....

उद्या वयाची २९ वर्षे पूर्ण करताना मनात अनेक विचार येत आहेत -

आता जॉब इंटरव्युजसाठीच्या कॉपिटिटिव्ह एक्झाम्सला बसता येणार नाही... मिलिटरी सर्विसेस मध्ये जाण्याची कितीही इच्छा असली तरी आता AGE BAAR चा शिक्का दिसेल, वयाच्या ह्या उंबऱ्यावर समाज ऑफिशिअली "मोठ्ठे" मानत असल्याने शिंग मोडून वासरात शिरणे अवघड होणार आहे....जॉब सिक्युरिटी ला महत्त्व आल्यामुळे आता ह्या कंपनीतून त्याकंपनीत उड्या मारणे कठीण होणार...
पण काही गोष्टी ज्या करायच्या राहून गेल्या असे वाटत आहे त्या मात्र आता नक्की करणार...कारण माझ्याकडे अजून ३६५ दिवस आहेत आणि लिस्ट काहीशी अशी आहे. वयाची तिशी ओलांडण्यापूर्वी ठरवलेल्या ३० गोष्टी....


~~~30 Things before i turn 30 : 


१)               पुणे आणि आसपासचा परिसर पिंजून काढणे -- दर आठवड्याच्या सुट्टीला मोटरसायकल काढायची आणि नवीन ठिकाण पाहण्यासाठी हुंदडायचे- किमान ३० नवीन पुणे आणि आसपासची प्रेक्षणीय/सांस्कृतिक स्थळे पाहायची ... आणि नुसती पाहायची नाही तर लोकांना ती सांगता यायला हवीत.

२)             किमान १५०० किमी म्हणजे पुन्हा टायर खराब होऊन बदलायला लागेस्तोवर सायकल चालवायची -(आत्ता टायर बदलले ते पडून पडून खराब झाल्याने) !

३)             एक तरी नवीन भाषा शिकायची.

४)             निदान एका शहरात राहणाऱ्या  मित्र मैत्रिणींना सोशल नेटवर्किंग पेक्षा डायरेक्ट फोन करून भेटून बोलायचे.

५)            जुन्या मित्र-मैत्रिणींना , ज्यांच्याशी काही ना काही कारणास्तव भांडणे झाली होती त्यांना फोन करायचा, गद्धेपंचविशीतली भांडणे तात्त्विक आणि तात्पुरती असतात, त्यांना वैचारिक जोड दिल्यावर असे कळले की काय फालतू  गोष्टींवर भांडत होतो आपण !!

६)              रोज सकाळी कराग्रे वसते, समुद्र वसने देवी - संध्याकाळी शुभंकरोती, आणि जेवताना वदनीकवल न चुकता म्हणायचे - मधली काही वर्षे थोडे पाश्चिमात्य वारे लागले होते पण असो, देर आये दुरुस्त आये !!

७)            आतापर्यंत लिहिलेले लेख, आणि काही नवीन लिहून "इ-बुक" का होईना  Publish करायचेच !!

८)             डान्स शिकायचा - निदान ३-४ गाण्यांवर तरी नीट, पब्लिकली नाचता यायला हवे !!

९)              किमान ३० नवीन पुस्तके वाचायची (इंग्रजी + मराठी)

१०)         पोळी भाजीचा स्वयंपाक शिकणे,  म्हणजे आत्ता येतेच - पण आई आणि बायकोसारखे जमले पाहिजे... (त्यांच्याएवढे नाही पण निदान सारखे तरी... )

११)          एखादा दिवस ३० की. मी. चालायचे... ( खूप जास्त नाहीये, ऑफिसमधून घरी चालत यायचे बस्स... !!)

१२)         रामरक्षा पाठ करायची

१३)         BUY A SUPERMAN SHIRT And TRY TO FIT in IT !

१४)        Give more surprises to wife !

१५)        Participate in maximum possible NGO/SOCIAL Activities to help the society.

१६)         Take an OUT OF INDIA Tour !

१७)        Have minimum of 3 BOYS Nightout like I use to have it in college time…

१८)         Keep making kids smile with joy, may be by giving him chocolates, giving him/her a ride on bike or just waiving a hello while going away from school bus.

१९)         Implement a rainwater harvesting idea at home.

२०)        GO VEG….. ! I’ll Try to avoid NON-VEG, Max constraint is <3 in="" p="" this="" times="" year.="">
२१)         Delete all the “EXTRA/RETAKE” photographs, videos taking space on my system. "डिजिटल आहे रे...कुठे पैसे पडतात !" ह्या सबबीखाली हार्ड ड्राईव्ह मध्ये नुसता कचरा साठलेला आहे !!

२२)       Try for PH.D ! but  thats being so tough with reservations and many talented geeks around….Will try to get another Master’s Degree/Advance diploma for my career enhancement.

२३)       Wash my CAR & BIKE on 1 of the 2 Weekly offs

२४)       Give One full day for gardening in the span of 3 months.

२५)      Arrange DOSA PARTY at home !

२६)        Write and publish more articles in daily newspapers

२७)      Remember contact numbers ….instead of trusting smart phone memory Like I use to have it in college time.

२८)       FIND & BUY Exactly similar JACKET & a SHIRT which I use to wear in COLLEGE TIME.  That’ll keep my mood and age lively years after years

२९)        किमान ३ सेलेब्रिटिस ला भेटायचे !! त्या लिस्ट मध्ये अशोक सराफ़ सगळ्यात टॉप ला आहेत !!

३०)        अवघड आहे --- पण तरीही,  वाढत्या महागाईनुसार INCOME SOURCE  साठी एखादे परमनंट सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे दुकान/ मकान वगैरे !!!

Friday, July 4, 2014

" इज्जत की रोटी " (सकाळ -४ जुलै २०१४ - मुक्तपीठ मध्ये प्रकाशित !)


४. २० ला येणारी गाडी लेट होत होत शेवटी ४. ५ तास लेट ची घोषणा झाली आणि ७. ३० ला थंडगार बिसलरीबाटलीतील शेवटचे काही घोट डोक्यावर ओतून मी पुन्हा वेटिंग रूम मध्ये पाय पसरून बसलो !!

मान्सून पूर्व एक सुट्टी गोव्याला घालवण्याच्या मनसुब्याने आम्ही पुणे-गोवा एक्स्र्पेस्चे तिकिट बुक केले. केवळ ६५० रुपयांत झालेल्या ह्या गोवा प्रवासाने पुन्हा एकदा "महंगा रोए एक बार... " ची अनुभूती दिली !


पुणेरी शिस्तीप्रमाणे आम्ही ४. २० च्या गाडीसाठी स्टेशनवर ४ ला'च हजर होते, परंतु ४. १६ ला पहिली वेळ पडली ती ५. २० ची! (कोर्टात तारीख पडते तशी) ऍडव्हान्स बुकिंग केले असल्यामुळे मन दुसरे पर्याय शोधायला राजी नव्हते, एकाच तासाचा प्रश्न आहे असो, काढू थोडा वेळ म्हणून मंडळींसह आम्ही आमचा मोर्चा वेटिंग रूम कडे वळवला. अत्यंत बेशिस्त पद्धतीने सगळा बाकडा अडवून झोपलेले लोक, ५ पैकी फक्त २ चार्जिंग पॉइंट्स चालू आणि कोपऱ्यातला एकच वर्किंग फॅन पाहून डोके अजूनच गरम झाले होते. बॅग खाली ठेवून पुन्हा एक कोल्ड्रिंक घेण्यासाठी बाहेर गेलो.

तिथे वाचायला पेपर पण घेतला आणि पाकीट परत ठेवणार तेवढ्यात मांडीला हाताने पकडून एक लहान मुलगा भीक मागायला लागला. "चल भाग बे! " पेपर वाला वसकन त्यावर ओरडला. परत येताना अजून दोन मुले कटोऱ्यामध्ये लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो ठेवून त्यातले कुंकू लोकांना लावून पैसे घेत होते... मनात विचार आला ज्याने लक्ष्मीलाच कटोऱ्यात ठेवले आहे त्यावर लक्ष्मी कशी प्रसन्न होईल बरं?

दुपारी ४. २० ला येणारी गाडी हरएक तासाला नवीन आगमन वेळ दाखवत दाखवत साधारण ८ः०५ ला रुळावर आली!
गाडी फुल्ल होतीच, आम्ही सामान/बॅग लावून घेतल्या, तहानलाडू भूक लाडू जवळ काढून घेतले आणि गाडी हालण्याची वाट पाहत होतो... तेवढ्यात समोरच्या डब्यातून एक माणूस गुडघ्यावर रांगत येताना पाहिला, त्याचा वेष, दाढी आणि केस पाहून साधारण साठीच्या वयाच्या आसपास आलेला असावा. प्रत्येक सिटखाली वाकून तो हातातल्या तुटक्या केरसुणीने कचरा भरून घेत होता.. मग जमा केलेला कचरा एक शर्टाच्या कपड्याने पुढे ढकलत डब्याच्या दरवाज्यातून बाहेर टाकायचा.


आमच्या सिट जवळ २ लोक बसले होते ते कचरा काढू देण्यासही उत्सुक दिसले नाहीत.. स्वतःच्या गप्पा मारण्यात रंगले होते की कोणीतरी आपल्या सिट खाली जातोय आणि त्याला आपले पाय लागत आहेत हे ही त्या बेशिस्त लोकांना समजत नव्हते.. पण तो माणूस मुकाटपणे सगळा कचरा गोळा करून पुढील सिट कडे जाण्यासाठी निघाला. एकदा आपल्या डोक्यावरील घाम हाताने पुसत त्याने दोन्ही बाजूच्या लोकांपुढे हात पसरले...!


मगाशी खाली पाय टेकवेनासा झालेला रेल्वेचा कंपार्टमेंट ह्या माणसाने अगदी स्वच्छ केला होता, मी लगेच १० रु ची नोट काढून त्याच्या हातात ठेवली आणि म्हणालो - " बाबा, तुम्ही खूप चांगले काम करत आहात, मेहनत से मिला एक रुपया भी आपकी इज्जत की कमाई है ! थँक्यू !! " भाषा समजली असेल की नाही ते कळले नाही पण माझ्या वाक्याने आणि आविर्भावामुळे त्याच्या चेहऱ्यावर त्या परिस्थितीत देखीआनंदाची छटा जाणवली.

थोडा पुढे जाताच बायको म्हणाली त्याला आपला बिस्किटांचा पुडा देऊया का ? - मी म्हणालो लगेच दे!
तोपर्यंत त्याने सगळ्या बोगीतील कचरा उचलून दरवाज्यातून बाहेर टाकला होता, बायकोने २ सिट ओलांडून त्याला बिस्किट दिले आणि हाताने खूण करत म्हणाली थोडं खाउन घ्या बाबा! कृतज्ञता दाखवत त्याने ते बिस्किट कपाळाला लावून नमस्कार केला आणि बाकीच्या बोगी साफ करण्यासाठी तो पुढे निघाला...!

मी आणि बायको पुढचा तासभर विचार करत होतो... की फुकट भिका मागणारे लोकं (विकलांग सोडून) आणि मेहनत करून कमाई करणारे लोक हा फरक बहुदा देवानेच बुद्धी देताना निर्माकेला असावा .. नाहीतर हात-पाय धड असताना लोकांना भिका मागायचा ईझी मनी आवडणे काही पटत नाही! मुन्नाभाई म्हणतो तसा ह्यांच्या डोक्यात पण आयतेपणाचा केमिकल लोचा असावा. असो ते देवाचे देवाला ठाऊक!

पण ह्या दिवसानंतर माझा जगण्याकडे बघायचा दृष्टिकोन एकदम बदलून गेला... दत्तात्रेयांनी २४ गुरू केले होते... मला माझा पहिला गुरू इथे मिळाला !ह्या सफाईकरणाऱ्या माणसाकडे पाहून एक कळलं की,
थोडी जिद्द आणि कष्टाची तयारी असेल जगात कोणीही कधीही उपाशी मरणार नाही. भले घास असो पण जे आहे ते मेहनत करून.

ह्यालाच म्हणतात इज्जत की रोटी !!