नेमेची येतो वाढदिवस"... लोकांसाठी एक वर्ष पण खऱ्या अर्थाने झालेली वाढ हि फक्त स्वतःला माहित असते !! तसे मागच्या वर्षीपासुनच (तिशीमध्ये आल्यावर) एकतिसाव्या वर्षात पदार्पणाबद्दल मनात खुप सारे विचार होते, त्या विचारांच्या तंद्रित एक छोटीशी लिस्ट देखिल बनवली होती मी, की ३० Things before i turn ३० !!
त्यातल्या बहुतांश तर पुर्ण केल्या आहेत काही बाकी राहिल्यात, पण सगळ्याच योजना पुर्ण झाल्या तर नवीन योजना बनवण्याची गम्मतच निघून जाईल... त्यामुळे ज्या पुर्ण झाल्या त्यात थोडेसे माझे कसब, तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट आणि ज्या अपुर्ण राहिल्या ती "श्रीं"ची ईच्छा !! 

मागच्या वर्षभराचा लेखाजोखा मांडताना एक लक्षात आले की तिशी च्या सुरवातीलाच आपण बरीच नकारघंटा लावली होती, AGE BAR, जॉब Change limitations, वगैरे.... !
पण अगदीच असे काही नाहिये, अनेक यशस्वी आणि मोठ्ठ्या लोकांनी त्यांच्या आयुष्य्याची सुरुवात तिशीनंतर केली आहे, उदाहरणार्थ - सिल्वेस्टर स्टॅलॉन(ऍक्टर). ओपरा विन्फ़्री (टॉक शो) ह्या लोकांना खरा सुर गवसला तो ३० वर्षांनंतरच ! एका ईटरव्यू मध्ये स्टॅलॉन म्हणाला होता की, Remember, Its never too late to start something !!
त्यामुळे आता पुन्हा आपला दिमाग जैसे थे वर आला आहे... आणि त्याच जिद्दीने आणि ध्येयाने पुढिल वाटचाल Positively करणार
!!

ह्या वर्षीचा वाढदिवस "एक उनाड दिवस" प्रेरित होता, कंपनीकडून "ADLABS IMAGICA" चे पास मिळालेले होते त्यामुळे संपुर्ण दिवस उनाडक्या करण्यात गेला, मज्जा आली !!
एफ.एम रेडिओ च्य रेड एफ एम मधून सुद्धा -वाढदिवसासाठी फोन आला होता - felt very Special by Wifey's this effort !!
एफ.एम रेडिओ च्य रेड एफ एम मधून सुद्धा -वाढदिवसासाठी फोन आला होता - felt very Special by Wifey's this effort !!

मागच्या लिस्टप्रमाणे श्रेयस तळपदे, पुजा सावंत, अनिकेत विश्वासराव, राहुल सोलापुरकर आणि अश्या अनेक Celebrities ला भेटलो पण अशोक सराफ ह्यांच्याशी झालेली भेट आयुष्यभर लक्षात राहिल !!
ह्या वेळी वाढदिवसाचे मनोगत लिहायला खुपच वेळ लागला खरा. . . . Matter तयार होता पण लेखन होत नव्हते... असो ह्या वर्षीप्रत्येक महिन्याला एक Article तरी लिहिणार आहे !!
वेताळा, ठरवलेल्या गोष्टी निट पार पडुदे रे महाराजा.....
विघ्न दूर कर आणि लढायची ताकद दे रे महाराजा...... !! (होय महाराजा !!!)
तीशीनंतरच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेछा!!
ReplyDelete