रेडिओ सिटी ९१.१ च्या एका स्पर्धेत जिंकल्यावर त्यांच्या ऑफिसमधून फोन आला,
'तुमचे 'झपाटलेला-२ 3D चे ब्लु-कार्पेट-प्रीमियर पासेस ठेवलेले आहेत, ते ऑफिसमधून घेऊन
जा' !
फोन ठेवल्यावर माझ्या तोंडून पहिले शब्द बाहेर पडले ते म्हणजे - 'आँम फट्ट स्वाःहहा... " !
तात्या विंचू, कुबड्या खवीस, हवालदार १००, टकलू हैवान, कवट्या महाकाळ, हि सगळी कॅरॅक्टर्स आपल्याला परिचित करून देणारे इंस्पेक्टर महेश जाधव! सगळा कंपू मस्त जमून आला असणार, 'झपाटलेला' माझ्या लहानपणी आलेला चित्रपट आम्ही मित्रांनी अनेकदा पुन्हा पुन्हा पाहिला, त्याचा हिंदी डब 'खिलॉना बना खलनायक'ची देखील पारायणे झाली
पण प्रत्येक वेळी 'महेश
कोठारेंचा चित्रपट' म्हटल्यावर मला नेहमीच थोडा 'ज्यादा' INTEREST असतो.
रेडिओ सिटीला अनेक धन्यवाद देऊन पासेस घेऊन आलो, संधाकाळचा शो होता, १ तास आधीच
थेटरवर पोचलो - अक्षरशः तिकिट खिडकीपासूनच 'ब्लु कार्पेट' घातलेले होते, फुग्यांची
आरास केलेली होती, ठिकठिकाणी वेलकम/रेडिओ सिटी/झपाटलेला२ चे बॅनर्स लावलेले
होते.
'सिनेमाच्या प्रीमियर' बद्दल बोलताना वपु काळे असं म्हणतात, की "वातावरण किती छान असतं सांगू, सगळीकडे फुगे सोडलेले असतात, माळा लावलेल्या असतात, कुंद-फुंद वातावरण झालेलं असतं - इतकं की समजा आपण कधी तिथे गेलो - पाहुणे म्हणून... तर आपण आपला 'बेसिक पे' विसरायचा असतो किंवा 'दोन खोल्यांचा संसार' ! पण हा प्रीमियर पाहताना ह्या दोन्हीपैकी एकही गोष्ट विसरायला न लावण्याबद्दल आम्ही रेडिओ सिटी ९१.१ FM चे आभारी आहोत
. आजकाल मोबाईल मुळे
घरात, ऑफिस-कॅब मध्ये, सगळीकडे बहुदा हेडफोन्सवर रेडिओ सिटी ऐकत असतोच, त्यात
RJ'च्या धमाल गप्पा गाणी आणि काँटेस्ट म्हटल्यावर तर अजून MOTIVATION मिळते !!
सिमेनागृहात गेल्या गेल्या एरवी येतो तसा रूम फ्रेशनर चा वास येण्याऐवजी गुलाबपाणी आणि अत्तराचा सुगंध आल्यावरच मला 'मराठी चित्रपटाच्या प्रीमियरचा' FEEL आला आणि ह्या सांस्कृतिक फरकामुळे विलक्षण आनंद झाला ! प्रीमियर म्हटलं की स्टारकास्ट आली, पाहुणे आले, धमाल धिंगाणा असतो सगळा.... संपूर्ण टीम प्रेक्षकांशी दिलखुलास बोलते
RJ लोक अत्यंत हुशारीने त्यांना बोलते देखिल करतात. RJ शोनाली ने रेडिओ सिटीकडून पुढाकार घेऊन पात्रांचा परिचय करून दिला, त्यासोबतच 'MOST AWAITED FILM' चे ऍवॉर्ड मिळाल्याचे ANNOUNCE केल्याने सगळ्यांनी स्टेज वरच्या सगळ्या टीम चे टाळ्या-शिट्या वाजवून अभिनंदन केले. चित्रपट संपल्यावर देखिल STARs,RJ's ला भेटण्यासाठी झुंबड होती. सगळे लोक अतिशय आनंदाने फोटो,सह्या आणि प्रेक्षकांच्या अभिवादनाला मान देत होते.

सिनेमा एकदा पाहायला उत्तम आहे,
सुरुवातीलाच लक्षाला दिलेली श्रद्धांजली पाहून चटकन झपाटलेला-१ ची आठवण होते,
त्याचे 'महेश.. महेश.. ' ओरडणे आजही तेवढेच भारी वाटते !
बहुदा सगळी तीच पात्रे परंतु नव्या ढंगाने दाखवून चित्रपटाची गोडी वाढवली आहे, कुबड्या खवीस - बदलला आहे, हवालदार १०० ने रखवालदाराची भूमिका मस्त रंगवली आहे
... बाबा
चमत्कार,विजय चव्हाण अर्थात तुक्या हवालदार (आता इंस्पेक्टर झालाय), ३D इफेक्टमुळे
उडणारी वटवाघुळे, रक्ताचे थेंब, फुलपाखरे, बर्फाचा गोळा, ह्यांचे ऍनिमेशन मस्त जमले
आहे ! आदिनाथ कोठारे लक्षाच्या मुलाचा रोल करत असल्याने Comparison तर होतेच परंतु
त्याने त्याचा प्रयत्न चांगला केला आहे, बाकी झपाटलेला १ च्या तुलनेत आवडी आणि
गौरी च्या ऐवजी घेतलेल्या सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकरला जास्त SCOPE नाही,
प्रेमप्रकरणे नीटशी रंगवली गेली नाहीत, गाणी ठीक-ठाक आहेत. लक्षात राहिली नाही तरी
तेवढ्यापुरता ताल धरला जातोच. मकरंद अनासपुरे ने बोलक्या बाहुल्यांचा खेळ दाखवून धमाल केली आहे !
असो, ओव्हरऑल आमची संध्याकाळ एकदम 'सुखात' गेली
.
रेडिओ सिटीच्या घोषणेप्रमाणे ते इथून पुढे अनेक ब्लु-कार्पेट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत, आम्ही पुन्हा जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करू..
सोबत एवढेच म्हणेन की,
LONG LIVE RADIO CITI 91.1 FM !!
& LONG LIVE BLUE CARPET !! ----> आँम फट्ट स्वाःहहा. !!
फोन ठेवल्यावर माझ्या तोंडून पहिले शब्द बाहेर पडले ते म्हणजे - 'आँम फट्ट स्वाःहहा... " !
तात्या विंचू, कुबड्या खवीस, हवालदार १००, टकलू हैवान, कवट्या महाकाळ, हि सगळी कॅरॅक्टर्स आपल्याला परिचित करून देणारे इंस्पेक्टर महेश जाधव! सगळा कंपू मस्त जमून आला असणार, 'झपाटलेला' माझ्या लहानपणी आलेला चित्रपट आम्ही मित्रांनी अनेकदा पुन्हा पुन्हा पाहिला, त्याचा हिंदी डब 'खिलॉना बना खलनायक'ची देखील पारायणे झाली

'सिनेमाच्या प्रीमियर' बद्दल बोलताना वपु काळे असं म्हणतात, की "वातावरण किती छान असतं सांगू, सगळीकडे फुगे सोडलेले असतात, माळा लावलेल्या असतात, कुंद-फुंद वातावरण झालेलं असतं - इतकं की समजा आपण कधी तिथे गेलो - पाहुणे म्हणून... तर आपण आपला 'बेसिक पे' विसरायचा असतो किंवा 'दोन खोल्यांचा संसार' ! पण हा प्रीमियर पाहताना ह्या दोन्हीपैकी एकही गोष्ट विसरायला न लावण्याबद्दल आम्ही रेडिओ सिटी ९१.१ FM चे आभारी आहोत

सिमेनागृहात गेल्या गेल्या एरवी येतो तसा रूम फ्रेशनर चा वास येण्याऐवजी गुलाबपाणी आणि अत्तराचा सुगंध आल्यावरच मला 'मराठी चित्रपटाच्या प्रीमियरचा' FEEL आला आणि ह्या सांस्कृतिक फरकामुळे विलक्षण आनंद झाला ! प्रीमियर म्हटलं की स्टारकास्ट आली, पाहुणे आले, धमाल धिंगाणा असतो सगळा.... संपूर्ण टीम प्रेक्षकांशी दिलखुलास बोलते
RJ लोक अत्यंत हुशारीने त्यांना बोलते देखिल करतात. RJ शोनाली ने रेडिओ सिटीकडून पुढाकार घेऊन पात्रांचा परिचय करून दिला, त्यासोबतच 'MOST AWAITED FILM' चे ऍवॉर्ड मिळाल्याचे ANNOUNCE केल्याने सगळ्यांनी स्टेज वरच्या सगळ्या टीम चे टाळ्या-शिट्या वाजवून अभिनंदन केले. चित्रपट संपल्यावर देखिल STARs,RJ's ला भेटण्यासाठी झुंबड होती. सगळे लोक अतिशय आनंदाने फोटो,सह्या आणि प्रेक्षकांच्या अभिवादनाला मान देत होते.
सिनेमा एकदा पाहायला उत्तम आहे,
सुरुवातीलाच लक्षाला दिलेली श्रद्धांजली पाहून चटकन झपाटलेला-१ ची आठवण होते,
त्याचे 'महेश.. महेश.. ' ओरडणे आजही तेवढेच भारी वाटते !
बहुदा सगळी तीच पात्रे परंतु नव्या ढंगाने दाखवून चित्रपटाची गोडी वाढवली आहे, कुबड्या खवीस - बदलला आहे, हवालदार १०० ने रखवालदाराची भूमिका मस्त रंगवली आहे

ह्या वेळी बाहुल्याच्या जास्त करामती नसल्या तरी तो
रस्ता क्रॉस करताना, व्हॅनमध्ये,बॅगांमागून उडी मारताना मस्त वाटते ! चित्रपट
संपताना पुन्हा एक ओपन लिंक ठेवलेली आहे - तात्याविंचू चे मुंडके महेश च्या
गाडीखाली पडलेले असते आणि तिथे कोणाचे लक्ष जात नाही - त्यामुळे झपाटलेला३ येण्याची
शक्यता नाकारता येत नाही.... पण Compare न करता एकदा पाहायला 'छान एंटरटेनमेंट
आहे.
असो, ओव्हरऑल आमची संध्याकाळ एकदम 'सुखात' गेली

रेडिओ सिटीच्या घोषणेप्रमाणे ते इथून पुढे अनेक ब्लु-कार्पेट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत, आम्ही पुन्हा जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करू..

LONG LIVE RADIO CITI 91.1 FM !!
& LONG LIVE BLUE CARPET !! ----> आँम फट्ट स्वाःहहा. !!
No comments:
Post a Comment