' !! आज बरेच दिवसांनी असा अचानक भेटायचा योग आला, दर्शन आणि मी रात्री १२ च्या आसपास फेसबुकवर भेटलो, आणि सकाळी ८ ला गुडलक ला भेटायचे अचानक ठरले, मग निनाद,सारंग,आलोक ई. लोकांना फोन फिरवले....
निनाद झोपेच्या इतका आहारी गेला आहे की तो आजकाल म्हणे मोबाइल SILENT करून झोपतो !! असो, अनेक दिवसांनी खरं काम करायची वेळ आली माणसावर की होत अस कधी कधी :) !
सारंग सध्या'च चतुर्भुज झाला असल्याने त्याचे रात्री फोन न-उचलणे समजून घेतले जाउ शकते, परंतु आता २४ तास होउनही साधा एक रिप्लाय न देता येणे ही गोष्ट पुढील मीटींगचे बील त्याच्या माथी मारण्यासाठी चालून जाईल...
आलोक ने फोन उचलला आणि वेळेत पोहोचला देखील, निनाद पण थोडा उशीरा का होईना पण पोचला... आम्ही, ४ लोक, फाउंडर मेंबर्स of eX-Students Group (जो काही मुर्ख माणसांमुळे अपेक्षेनुसार पुढे चालवता आला नाही..) असे सहज भेटलो... गप्पांच्या ओघात तास-दिड तास कसा गेला कळलं नाही.... शाळेतल्या बेंच पासून ते शिपायांपर्यंतचे विषय हा हा म्हणता निघत गेले...


आणि जर तुम्ही सुद्धा eX-abhinav वाले असाल् तर मग आमचा कंपू तुमच्यासाठी तसाही RED CARPET घालून OPEN आहे ....
असे हास्य-विनोदाचे क्षण अनुभवायचे असतील तर पुढच्या वेळी तुम्ही पण नक्की या "गुडलक" मध्ये Ex-Student's meeting sathi---- (NOTHIN RELATED TO ANY ACTIVITY OR ANY CAUSE, ITS JUST A FRIENDLY MEET !!)
No comments:
Post a Comment